AIIMS Cyber Attack Sakal
विज्ञान-तंत्र

AIIMS Cyber Attack: एम्सवर सायबर हल्ला; हॅकर्सने मागितले २०० कोटी, माजी पंतप्रधानांसह ४ कोटी रुग्णांचा हेल्थ डेटा धोक्यात

दिल्ली येथील एम्सवर मोठा सायबर हल्ला झाला असून, हॅकर्सने २०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या हॉस्पिटलमध्ये माजी पंतप्रधानांसह अनेक नेत्यांवर उपचार झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Cyber attack at AIIMS Delhi: दिल्ली येथील प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलवर मोठा सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. गेल्या एक आठवड्यापासून येथील सर्व्हर डाउन आहे. हा हल्ला कसा झाला, याची चौकशी सध्या सुरू आहे. रिपोर्टनुसार, हॅकर्सने यासाठी २०० कोटी रुपयांची देखील मागणी केली आहे. परंतु, पोलिसांनी मात्र अशी कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कधीपासून डाउन आहे सर्व्हर?

एम्सचे सर्व्हर २३ नोव्हेंबरपासून डाउन असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात देखील करण्यात आली असून, याचा तपास दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटजिक ऑपरेशन (IFSO) यूनिटद्वारे केली जात आहे. तसेच, इंडियन कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पॉन्स टीम, दिल्ली पोलीस, सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (सीबीआय), इंटेलिजेंस ब्यूरो (आयपी) आणि गृह मंत्रालयाद्वारे देखील याचा तपास केला जात आहे. हा रॅन्समवेअर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

२०० कोटींची केली मागणी?

रिपोर्टनुसार, हॅकर्सने एम्सकडे २०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम क्रिप्टोकरन्सी स्वरुपात मागितली आहे. परंतु, दिल्ली पोलिसांनी अशी कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती लीक होण्याची शक्यता

एम्स हे देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलपैकी एक आहे. येथे अनेक प्रमुख व्यक्तींचा मेडिकल रेकॉर्ड आणि डेटा आहे. यामध्ये माजी पंतप्रधान, मंत्री, अधिकारी आणि व्हीआयपी व्यक्तींचा समावेश आहे. या हँकिंगमध्ये जवळपास ३ ते ४ कोटी व्यक्तींचा डेटा लीक होण्याची भिती आहे.

तपास यंत्रणेच्या सल्ल्यानंतर हॉस्पिटलने इंटरनेट कनेक्शन बंद केले आहे. ई-हॉस्पिटलसाठी NIC च्या ई-हॉस्पिटल डेटाबेस आणि अ‍ॅप्लिकेशन सर्व्हरचा वापर केला जात आहे. अनेक सेवा मॅन्यूअली पार पाडल्या जात आहेत.

कॉम्प्युटर आणि सर्व्हरमध्ये अँटीव्हायरस इंस्टॉल केले जात आहे. आतापर्यंत ५ हजारपैकी १२०० कॉम्प्युटर्समध्ये अँटीव्हायरस इंस्टॉल करण्यात आला आहे. तसेच, ५० पैकी २० सर्व्हर स्कॅन करण्यात आलेत. सर्व्हरच्या स्कॅनिंगचे काम २४ तास सुरू असल्याची माहिती देखील एम्सने दिली आहे. सर्व्हर पूर्णपणे दुरुस्त होण्यासाठी अजून ५ दिवस लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT