मुंबई : सायबर क्राईम पोर्टलवर लोक त्यांच्यासोबत झालेल्या सायबर क्राईमची तक्रार नोंदवू शकतात आणि स्वतःच्या नुकसानी विरोधात न्याय मिळवू शकतात.
आजकाल देशातले अनेक लोक ऑनलाइन पेमेंट करतात. अगदी वीज बिल भरणे असो वा रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट बुक करणे असो, एवढच काय तर अगदी चहा प्यायला नंतरही कॅश देण्याऐवजी लोकं ऑनलाईन पेमेंट करत असतात.
अनेक वेळा इंटरनेटच्या अतिवापरामुळे लोक सायबर क्राईमला बळी पडतात. सायबर क्राईममध्ये बँकिंग फसवणूक, ऑनलाइन घोटाळा आणि असे बरेच काही समाविष्ट आहेत.
सायबर क्राइम रोखण्यासाठी भारत सरकारने सायबर क्राईम पोर्टल सुरू केले आहे.
सायबर क्राईम पोर्टलवर लोक त्यांच्यासोबत झालेल्या सायबर क्राईमची तक्रार करू शकतात आणि गुन्ह्याविरुद्ध न्यायाची मागणी करू शकतात.
सायबर क्राईमची ऑनलाइन तक्रार कशी करावी
- सायबर क्राईमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला आधी सायबर क्राईम पोर्टलवर जाव लागेल.
- नंतर मेन पेजवर स्क्रोल करा आणि खाली जा. येथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल.
- बॉक्समध्ये तुम्हाला, Learn About Cyber Crime आणि File a Complaint असे 2 पर्याय दिसतील. यापैकी File a Complaint वर क्लिक करा.
- त्यानंतर I accept वर क्लिक करा.
- हे केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये Report Other Cyber Crime च्या बटणावर क्लिक करा.
- जर तुम्ही पोर्टलवर आधीच नोंदणी केली नसेल तर नवीन वापरकर्त्यासाठी Click Here for New User येथे क्लिक करा.
- येथे विचारले जाणारे सर्व तपशील टाका ई-मेल आयडी, मोबाइल नंबर इ.
- तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो तिथे टाका आणि Submit वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरण्यास सांगितले जाईल.
- फॉर्ममध्ये 4 भाग असतील. यामध्ये घटनेचा तपशील, संशयित तपशील, तक्रारीचा तपशील भरा.
- त्यानंतर save आणि next वर क्लिक करा.
- त्याचप्रमाणे सर्व तपशील भरा आणि शेवटी Confirm आणि Submit बटणावर क्लिक करा.
- तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही तक्रारीची PDF फाईलही डाउनलोड करू शकता.
क्राईम कंप्लेंटला ट्रॅक करा.
तुम्हाला तुमच्या तक्रारीला ट्रॅक करायचं असेल तर Home पेजवर दिलेल्या Track your complaint या पर्यायावर क्लिक करा. नंतर, मागितलेली माहिती भरा आणि sumbit करा. आता तुमच्या तक्रारीला तुम्ही ट्रॅक करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.