fraud apps google
विज्ञान-तंत्र

Cyber fraud : मोबाईलमधून लगेच डिलीट करा हे १७ अॅप्स; नाहीतर होईल नुकसान

आता अलीकडेच गुगलने अनेक अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. हे अॅप्स लोकांच्या फोनमध्ये शिरतात आणि त्यांच्या फोनमधून पैसे चोरतात.

नमिता धुरी

मुंबई : जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आजकाल सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कंपन्यांकडूनही विविध पावले उचलली जात आहेत. दुसरीकडे, तुमच्या फोनमध्येही असे काही अॅप्स आहेत, जे पैसे चोरू शकतात.

आता अलीकडेच गुगलने अनेक अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. हे अॅप्स लोकांच्या फोनमध्ये शिरतात आणि त्यांच्या फोनमधून पैसे चोरतात. गुगलने प्ले स्टोअरवरून एकूण १७ अॅप काढून टाकले आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, 12 अँड्रॉइड अॅप्स डिव्हाइसमधून वापरकर्त्यांचे बँकिंग तपशील चोरत असल्याचे आढळल्यानंतर, आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये लोकांच्या फोनमधून पैसे चोरले जात आहेत. यामुळे गुगलने हे 17 अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत.

ट्रेंड मायक्रो या सिक्युरिटी रिसर्च फर्मच्या रिपोर्टनुसार, हे अॅप्स युजर्सचे बँकिंग क्रेडेंशियल, पिन, पासवर्ड आणि ऑनलाइन बँकिंग अॅप्सशी संबंधित इतर अनेक माहिती चोरत होते.

तुमच्या फोनमध्येही यापैकी काही अॅप्सचा समावेश असेल, तर ते लवकरात लवकर अनइंस्टॉल करा कारण ते तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात.

1. Call Recorder APK (com.caduta.aisevsk)

2. Rooster VPN (com.vpntool.androidweb)

3. Super Cleaner- hyper & smart (com.j2ca.callrecorder)

4. Document Scanner – PDF Creator (com.codeword.docscann)

5. Universal Saver Pro (com.virtualapps.universalsaver)

6. Eagle photo editor (com.techmediapro.photoediting)

7. Call recorder pro+ (com.chestudio.callrecorder)

8. Extra Cleaner (com.casualplay.leadbro)

9. Crypto Utils (com.utilsmycrypto.mainer)

10. FixCleaner (com.cleaner.fixgate)

11. Just In: Video Motion (com.olivia.openpuremind)

12. com.myunique.sequencestore

13. com.flowmysequto.yamer

14. com.qaz.universalsaver

15. Lucky Cleaner (com.luckyg.cleaner)

16. Simpli Cleaner (com.scando.qukscanner)

17. Unicc QR Scanner (com.qrdscannerratedx)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT