Data Sharing App esakal
विज्ञान-तंत्र

Data Sharing App: iPhone मधून Android मध्ये Data शेअर करण्याचं काम होईल सोपं ; हे Apps करतील मदत!

डेटा ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार

Pooja Karande-Kadam

Data Sharing App: आजकाल नवा फोन घेणं आणि जूना फेकून देणं हे अनेकांच रोजचं कामं बनलं आहे. फोनमध्ये येत असलेल्या व्हरायटीजमूळे लोकही मोबाईल घेण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाहीत.त्यामूळे जून्या मोबाईलमधून डाटा घेणं तो नव्या मोबाईलमध्ये सेव्ह करणं यात तासंतास निघून जातात.

जुन्या मोबाइलवरून नवीन मोबाइलमध्ये डेटा ट्रान्सफर करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डेटा ट्रान्सफर केबलच्या साहाय्याने एका फोनवरून दुसऱ्या फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यात अनेक तास वाया जातात. पण आता काही अॅप्लिकेशन्सच्या मदतीने आम्ही आमच्या iPhone वरून Android फोनवर डेटा सहजपणे ट्रान्सफर करू शकता.

यामध्ये Google Drive पासून Drop Box पर्यंत अनेक अॅप्सचा समावेश आहे, चला जाणून घेऊया अशा काही अॅप्सबद्दल ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे डेटा ट्रान्सफर करू शकता.

MobileTrans

MobileTrans हे iOS वरून Android वर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बेस्ट अॅप्सपैकी एक आहे. फक्त एका क्लिकच्या मदतीने तुम्ही दोन फोनमधील डेटा सहज शेअर करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलवर MobileTrans सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर, आपल्याला दोन्ही उपकरणांना संगणकाशी जोडावे लागेल. आणि 'फोन ट्रान्सफर' ऑप्शनमधून 'फोन टू फोन' वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला शेअर करायची असलेली फाइल सिलेक्ट करा आणि स्टार्ट बटण दाबा. काही वेळात तुमचा डेटा Android डिव्हाइसवर कॉपी केला जाईल.

Google Drive

Google Drive हे एक अॅप आहे जे Android डिव्हाइसवर iOS डेटा सहजपणे शेअर करू शकते. आयफोनवरून अँड्रॉइड अॅपवर डेटा ट्रान्सफर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. Google ड्राइव्ह वापरकर्त्यांना त्यांच्या मीडिया फायली गोळा करण्यासाठी 15 GB पर्यंत विनामूल्य सेवा देते.

येथे तुम्ही तुमच्या iPhone चा डेटा साठवू शकता आणि नंतर तोच डेटा तुमच्या Android डिव्हाइसवर डाउनलोड करून ठेवू शकता. Google Drive च्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सुरक्षा. तुम्ही त्यात जो काही डेटा ठेवाल तो नेहमी कोणत्याही व्हायरसपासून सुरक्षित असेल.

इथेही तुमचा सर्व Data सुरक्षित राहतो

SHAREit

डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बेस्ट अॅप्सच्या यादीत SHAREit देखील येतो. SHAREit ची लोकप्रियता खूप जास्त आहे आणि बरेच लोक ते वापरतात. त्याच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे इंटरनेटच्या मदतीशिवायही तुम्ही तुमचा डेटा सहज शेअर करू शकता. हे तुम्हाला डेटा ट्रान्सफरसाठी 20 Mbps पर्यंत स्पीड देते.

Samsung Smart Switch

Samsung Smart Switch अॅप एक वायरलेस डेटा ट्रान्सफर अॅप आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही आयफोन वरून Android वर डेटा सहजपणे शेअर करू शकता. ते पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला दोन्ही उपकरणांना USB केबलने जोडावे लागेल. तुम्ही तुमचे Contacts, message, Photos, Doccuments, Call log, Music असं बरेच काही शेअर करू शकता.

Google Drive हे विश्वासू App मानले जाते

DropBox

Dropbox ही क्लाउड स्टोरेज सुविधा आहे. तुम्ही तुमच्या सर्व फाईल्स ड्रॉपबॉक्समध्ये सेव्ह करू शकता. कोणत्याही फोनवर कुठूनही त्यामध्ये प्रवेश करू शकता. तुम्ही तुमच्या iPhone चा डेटा त्याच्या क्लाउडवर ठेवू शकता आणि नंतर गरज पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या Android फोनवर डाउनलोड करून वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT