Deepfake Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Deepfake Scam : मित्राचं रुप घेऊन केला व्हिडिओ कॉल, डीपफेकच्या मदतीने हजारोंचा गंडा! कशी झाली फसवणूक?

Sudesh

Deepfake Fraud Scam : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयच्या येण्यामुळे कित्येक कामं सोपी झाली आहेत. मात्र याचा गैरवापर करण्याचं प्रमाणही तितकंच वाढलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदाना आणि कॅटरीना कैफ या बॉलिवूड अभिनेत्री डीपफेकला बळी पडल्या होत्या. आता याच्या मदतीने फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

राधाकृष्णन नावाच्या एका व्यक्तीसोबत हा प्रकार झाला आहे. राधाकृष्णन आणि वेणुकुमार हे दोन मित्र कोल इंडिया कंपनीत एकत्र काम करत होते. याच वेणुकुमारचं नाव घेत राधाकृष्णनची फसवणूक करण्यात आली. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अशी झाली फसवणूक

स्कॅमरने आधी कुठूनतरी वेणुकुमार आणि त्याच्या कुटुंबीयांचे फोटो मिळवले. यानंतर त्याने हे फोटो राधाकृष्णनला पाठवून त्याचा विश्वास संपादन केला. स्कॅमर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने डीपफेकचा वापर करुन राधाकृष्णनला व्हिडिओ कॉलही केला. यामध्ये व्हिडिओत तो अगदी वेणु कुमारसारखा दिसत होता.

यानंतर आपली बहीण आजारी असून, तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचं वेणुकुमारने (स्कॅमरने) राधाकृष्णनला सांगितलं. यानंतर राधाकृष्णनने त्याला 40 हजार रुपये पाठवले. त्यानंतर स्कॅमरने पुन्हा 35 हजार रुपयांची मागणी केली, तेव्हा राधाकृष्णनला संशय आला. त्याने वेणुकुमारच्या जुन्या नंबरवर कॉल केला. यावेळी वेणुकुमारने आपण कसलेही पैसे मागितले नसल्याचं स्पष्ट केलं. (Tech News)

पोलिसांनी केली कारवाई

यानंतर राधाकृष्णनने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सुमारे चार महिने तपास केल्यानंतर गुजरातमधून एका संशयित आरोपीला अटक केली. या घोटाळ्याचा मास्टरमाईंड कौशल शाह अद्याप फरार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2024: डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Nitesh Rane: नितेश राणेंची अटक टळली! मुंबई हायकोर्टानं अजामीनपात्र वॉरंट केलं रद्द, पण...

Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीला माहितीए 'त्यांचा' चेहरा चालणार नाही, मग महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी; गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु

Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा 16 की 17 ऑक्टोबरला? वाचा शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT