Scam Sakal
विज्ञान-तंत्र

Cyber Fraud: जामताडाच्या स्कॅमर्सचा नवा कारनामा, विना OTP खात्यातून उडवले ५० लाख; पाहा कशी केली फसवणूक

दिल्ली येथील व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ५० लाख रुपयांना गंडा घातला आहे.. विशेष म्हणजे व्यक्तीने कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

Jamtara like attack: सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ओटीपी कोणालाही शेअर करू नये, अशी सूचना वारंवार दिली जाते. परंतु, आता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवीन मार्ग शोधला आहे. विना ओटीपी देखील फसवणूक होत असल्याचे देखील आता समोर आले आहे. टेक्नोलॉजीची मदत घेत सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत.

अशीच एक फसवणुकीची घटना दिल्लीतील येथील एका व्यक्तीसोबत घडली असून, त्याच्या बँक खात्यातून ५० लाख रुपये काढण्यात आले आहेत. त्यांच्या फोनवर काही मिसकॉल्स आले होते. सायबर गुन्हेगांना त्यांच्याकडे ओटीपी न मागता ट्रांजॅक्शन पूर्ण केले. रिपोर्टनुसार, ही घटना सिक्योरिटी सर्व्हिसमध्ये संचालक पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे.

या व्यक्तीला काही मिस कॉल्स आले होते. सुरुवातीला या फोन्सकडे दुर्लक्ष केले. परंतु, काही कॉल्स उचलल्यावर समोरून आवाज आला नाही. काहीवेळानंतर फोनमधील मेसेज पाहिल्यावर त्यांना धक्का बसला आहे. रियल टाइम ग्रॉस सेटलमेंटद्वारे (RTGS) त्यांच्या बँक खात्यातून ५० लाख रुपये काढण्यात आले होते. या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, सुरुवाती तपासात ही फसवणूक जामताडा येथील लोकांनी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

OTP न मागता फसवणूक

फसवणूक झालेल्या व्यक्तीने माहिती दिली की, ओटीपी शेअर केला नव्हता, तरीही फसवणूक झाली. असे स्कॅम खासकरून जामताडा येथील गुन्हेगार करतात. ते फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. या घटनेत सायबर गुन्हेगारांनी सिम स्वॅप केले असण्याची शक्यता आहे.

सिम स्वॅप फ्रॉड काय आहे?

स्विम स्पॅम फ्रॉडमध्ये स्कॅमर्स टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनला बायपास करून व्यक्तीच्या मोबाइल नंबरचा अ‍ॅक्सेस काढून घेतात. यामुळे मोबाइल नंबरवर येणारे कॉल्स आणि मेसेज देखील स्कॅमर्सपर्यंत पोहचतात. सिम स्विचिंगसाठी फ्रॉडस्टर्स SIM प्रोव्हाइडर्सला कॉन्टॅक्ट करून स्वतः खरी व्यक्ती असल्याचे भासवतात. एकदा सिम सुरू झाल्यावर त्या नंबरवर येणारे सर्व मेसेज स्कॅमर्सपर्यंत पोहचतात. अशाप्रकारे, मोबाइलवर येणाऱ्या मेसेज व कॉलच्या मदतीने आर्थिक फसवणूक केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT