google sakal
विज्ञान-तंत्र

Digital Skills : डिजिटल गॅरेज टूल्स आणि कौशल्ये

डिजिटल गॅरेज ही संकल्पना सर्वप्रथम गुगलने ऑनलाइन जगतामध्ये प्रभावीपणे मांडली.

सकाळ वृत्तसेवा

डिजिटल गॅरेज ही संकल्पना सर्वप्रथम गुगलने ऑनलाइन जगतामध्ये प्रभावीपणे मांडली. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन उपस्थिती साधने, विपणन आणि जाहिरात साधने, स्थानिक आणि सामाजिक साधने, विश्लेषण साधने, निर्यात साधने, ई-कॉमर्स साधने आदी अद्ययावत डिजिटल स्किल्सच्या टूल्सचा समावेश होतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी विविध प्रकारची विशिष्ट कारणांसाठी उपलब्ध असलेली डिजिटल टूल्स सक्षमपणे वापरण्याच्या पद्धतींसाठी डिजिटल गॅरेजचा उपयोग होत आहे.

गुगल माय बिझनेस वेबसाइट, लर्न माय वे, विक्स, जिमडो, टेस्ट माय साइट, जी सूट, गुगल माय स्टोअर आदीं टूल्स ही ऑनलाइन प्रेझेंन्ससाठी अत्यावश्यक असून त्यांच्या कार्यपद्धती डिजिटल गॅरेजमध्ये सविस्तरपणे कौशल्य-विस्ताराने उपलब्ध केलेल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग टुल्समध्ये गुगल अॅडस, बिंग अॅडस, ट्विटर अॅडस, फेसबुक अॅडस, लिंकडिन मार्केटिंग सोल्यूशन्स अशा अनेक डिजिटल टूल्सचा समावेश होतो.

गुगल माय बिझनेस, बिंग प्लेसेस, फेसबुक फॉर बिझनेस, ट्विटर बिझनेस ही सारी टूल्स ‘लोकल व सोशल’ टूल्समध्ये समाविष्ट आहेत. निर्यात बाजारपेठ काबीज करण्यासाठी अनेक डिजिटल टूल्स वापरात येतात यामध्ये विशेषतः एक्स्पोर्ट ब्रिटेन, मार्केट फाईंडर या टूल्स वापराची कौशल्ये उपयोगी आहेत.

ऑनलाइन अस्तित्वाद्वारे मॅग्नेटो, प्रेसटोशॉप, ईकॉमर्स, बिगकॉमर्स अशी विविध संसाधने ई-कॉमर्सच्या विविध पद्धतीही डिजिटल गॅरेजद्वारे अनेक कामे करताना उपयोगी ठरत आहेत.

अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांचे डिजिटायझेशन करताना कोणती डिजिटल टूल्स त्या-त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियांसाठी योग्य आहेत व त्यांची निवड करण्याची कौशल्ये प्राप्त करणे हीसुद्धा रोजगार क्षमता वाढीसाठी प्रमुख गरज बनली आहे. त्यामुळेच डिजिटल कौशल्यांबरोबरच ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ पद्धतींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

डिजिटल प्रक्रिया परिवर्तन, खर्च कमी करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पुनर्वापराचा वेळ कमी करण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुधार, व्यवसाय मॉडेल परिवर्तन, डोमेन परिवर्तन, आणि सांस्कृतिक व संघटनात्मक परिवर्तन आदींद्वारे ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ सहज शक्य झाले असल्याने या क्षेत्रातील कौशल्यधारकांची मागणी वाढते आहे.संस्थात्मक प्रणाली बदल आणि विकास, संगणकीय प्रणाली विचार, व्यवसाय प्रक्रिया विश्लेषण, लीन मॅनेजमेंट, रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन, डिजिटल इनोव्हेशन आणि इतर सैद्धांतिक पैलूंबद्दलचे कौशल्य जे व्यवसाय परिवर्तनामध्ये योगदान देते अशा क्षमता धारकांनाही विविध संधी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT