Chandrapur Dinosaur Fossil Site : जगात सर्वत्र पुरातत्वीय आणि वारसा स्थळे जपली जात असून पर्यटन आणि अभ्यासासाठी ती संरक्षित केली जातात. परंतु भारतात राजकीय, प्रशासकीय आणि जनतेच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक स्थळे नष्ट होत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील ६५ मिलियन वर्षापूर्वीच्या विशालकाय डायनॉसोरचे एकमेव जीवाश्म स्थळ आज नष्ट झाले आहे. भावी अभ्यासक, विद्यार्थ्यांसाठी ते आता उपलब्ध राहणार नाही अशी माहिती भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात केवळ टेमुर्डा- पिसदुरा या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डायनॉसोरचे जीवाश्म आढळतात. याच परिसरात भद्रावती तालुक्यातदेखील अल्प अवशेष मिळाले आहेत. पिसदुरा येथे डायनॉसोरची हाडे, विष्ठा, शंख-शिंपले आणि वनस्पती जीवाश्म मोठ्या प्रमाणावर आढळत होती. प्रा. सुरेश चोपणे यांनी १९९९ पासून आजपर्यंत या परिसरात संशोधन करून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले होते. २७ एप्रिल २०२४ रोजी चोपणे यांनी या परिसराला सर्वेक्षणाच्या दृष्टीने भेट दिली.
तेव्हा येथील सर्व जीवाश्मे जवळजवळ नष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले. आतापर्यंत त्यांनी गोळा केलेले हे अमूल्य पुरावे संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी व्यक्तिगत अश्म संग्रहालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी भोगे यांना एक प्रस्ताव सादर करून पिसदुरा येथे डायनॉसोर पार्क आणि भद्रावती येथे मोठे पुरातत्त्व संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाला होता.
परंतु तत्कालीन सरकारने मजुरीला वेळ लावल्याने डायनॉसोर स्थळ, जिल्ह्यातील पुरातत्वीय आणि ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण होऊ शकले नाही. चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आहे. आजसुद्धा पुरातत्त्व विभागाचे संग्रहालय होऊ नये ही खेदाची बाब आहे. जिवती येथील जीवाश्मस्थळ असेच काही संशोधक आणि भूशास्त्र विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी जीवाश्मे गोळा करून संपवून टाकले. पिसदुरा हे स्थळ संरक्षित न केल्याने डायनॉसोरचे जीवाश्मे विविध कारणाने आज गायब झाले आहेत. त्यात शेतीची कामे, शेतीसाठी अतिक्रमण, बाहेरून येणाऱ्या संशोधक आणि लोकांनी जीवाश्मे घेऊन जाणे आणि विकणे अशा कारणांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.