Google Sakal
विज्ञान-तंत्र

Google Diwali Gift : गूगलकडून यूजर्सला 'दिवाली सरप्राइज'; 'हे' शब्द सर्च करा अन्...

दिव्यांचा सण दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google Diwali Surprise : दिव्यांचा सण दिवाळी (Diwali Festival) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही शक्कल लढवत आहे. अनेक दुकानांमध्ये नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखविले जात आहे. या सर्वामध्ये इंटरनेटवर तासंतास घालवणाऱ्या युजर्सला गूगलकडूनही (Google) दिवाळीचं खास सरप्राइज देण्यात आलं आहे. गुगलने देशातील यूजर्ससाठी त्यांचा होमपेजवर सर्च टेक्स्ट बॉक्समध्ये 'दिवाळी' असे सर्च केल्यास संपूर्ण पेज दिव्याने प्रकाशमय झालेले दिसेल. (Google Diwali Surprise For Users )

Google वर सर्च करा Diwali

गुगल इंडिया (Google India) वेबसाइटवरील सर्च बॉक्समध्ये 'दिवाळी' असे सर्च केल्यावर या सणाविषयी विविध परिणाम दिसून येतील. या निकालांच्या शीर्षस्थानी 'दिवाळी' हा शब्द लिहिलेला असून, याच्या खाली 'दिवा' दिसून येईल. पेजवर दिसणार हा दिवा साधा नसून चमकणाऱ्या ताऱ्यांनी वेढलेला आहे. या दिव्यावर क्लिक केल्यावर युजर्सला त्यांची स्क्रीन चमकणाऱ्या दिव्यांनी भरलेली दिसेल. एवढेच नव्हे तर, कर्सर हलवल्यावर दिवा स्क्रीनभोवती फिरतो. 'दिवाळी 2022' सर्च केल्यानंतर हे दृष्ट सुंदर अॅनिमेशन स्वरूपात दिसते.

अशी होणार स्क्रीन प्रकाशमय

Google मोबाइल अॅपवर 'Diwali' किंवा 'Diwali 2022' हे कीवर्ड शोधल्यास युजर्सला Android आणि Apple दोन्ही डिव्हाइसवर एकसारखेच परिणाम मिळतील. अॅपवरील (iOS आणि Android दोन्ही) कोणत्याही दिव्यावर क्लिक केल्यावर, युजर्सच्या मोबाइल स्क्रीनवर प्रकाशमय होईल तर, बोटांच्या हालचालीनुसार स्क्रीनवरील दिवा हालतांना दिसेल.

डेक्सटॉप किंवा लॅपटॉवर गूगलचं हे विशेष सरप्राइज अनुभवण्यासाठी यूजर्सला ब्राउझर विंडोमध्ये गुगल ओपन करावे लागेल. यासाठी यूजर्सला सर्वात प्रथम सर्च बॉक्समध्ये 'Diwali' किंवा 'Diwali 2022' कीवर्ड शोधावे लागतील. त्यानंतर स्क्रीनवर जे परिणाम दिसून येतील ते वरच्या बाजूला दिव्याच्या सहाय्याने लिहिले जातील. यानंतर समोर दिसणाऱ्या दिव्यावर क्लिक केल्यास आणि कर्सर हलवल्यास संपूर्ण स्क्रीन दिव्यांनी उजळलेली दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT