Cyber Fraud esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Fraud होताच लगेच या नंबरवर कॉल करा; अशी करा ऑनलाइन तक्रार अन् वाचवा तुमचे पैसे

तुमच्यासोबतही कधी काळी असे काही घडल्यास काही महत्वाच्या नंबरवर लगेच कॉल केल्यास तुमचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Cyber Crime: सायबर फ्रॉडच्या केसेस दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे योग्य वेळी सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्वाचे आहे. तुमच्यासोबतही कधी काळी असे काही घडल्यास काही महत्वाच्या नंबरवर लगेच कॉल केल्यास तुमचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता. तसेच तुम्ही ऑनलाइन तक्रारीची नोंदही करू शकता. जाणून घ्या योग्य पद्धत.

घरी चोरी झाल्यास तुम्ही पोलिसांत तक्रार करता. मात्र तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाल्यास तुम्ही पोलिसांत तक्रार नोंदवण्यापर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमधून गेलेले असतील.

लगेच या नंबरवर कॉल करा

  • अनेक लोकांना त्यांच्यासोबत फ्रॉड झाल्यास कुठे जावे हेच कळत नाही. मात्र घाबरू नका. लगेच 1930 हा नंबर डायल करा.

  • तुम्ही घटना घडल्यास लगेच या नंबरवर कॉल केरून घडलेल्या घटनेचे डिटेल्स दिलेत तर तुमचे पैसे स्कॅमर्स काढण्याआधीच वाचतील.

  • फ्रॉड झाल्यानंतर लगेच एक तासाच्या आत तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे.

  • तुम्हाला एक तासाच्या आत तुमच्या बँक डिटेल्स, पॅन व आधार कार्ड UPI लिंक या डिटेल्स पोलिसांना द्याव्या लागतील.

अशी फाइल करा ऑनलाइन तक्रार

  • यासाठी तुम्ही https://www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स मिळतील. येथे तुम्हाला Report Cyber Crime सेक्शनवर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला File a Complaint या ऑप्शनवर क्लिक करा.

  • येथे एक मॅसेज वाचून तुम्हाला I Accept चेक बॉक्सवर क्लिक करा.

  • येथे तुमच्यापुढे नवी विंडो ओपन होईल. येथे तुम्हाला ऑनलाइन डिटेल्स भरायची आहे.

  • येथे तुम्हाला न्यू यूजर ऑप्शनवर जाऊन रजिस्टर करावं लागेल.

तुम्हाला येथे राज्य, लॉगइन आयडी, मोबाइल नंबर डिटेल्स एंटर करावी लागेल. यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. यात एंटर करून तुम्हाला कॅप्चा टाकत सबमिट करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही लॉगइन कराल.

आता लॉगइन नंतर तुम्हाल कंप्लेंट रजिस्टरवर क्लिक करावं लागेल. येथे तुम्हाला कॅटेगिरी ऑफ कंम्प्लेंट मध्ये 8 ऑप्शन्स मिळेल. ज्या कॅटेगिरीमध्ये तुम्हाला कंम्प्लेंट करत सिलेक्ट करावी लागेल. यानंतर तुम्हाला सब-कॅटेगिरीवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर घटनेशी संबंधित डिटेल्स तुम्हाला सबमिट करावी लागेल.

त्याच्याच बाजूला तुम्हाला Suspect Details चं ऑप्शन मिळेल. यानंतर Complainant Details म्हणजेच तक्रारकर्त्याच्या डिटेल्सचं ऑप्शन मिळेल. येथे तुम्हाला डिटेल्स भरून सेव करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रीव्हूव्ह आणि सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT