Taylor Swift AI Image Posted by Trump Raises Legal and Ethical Concerns esakal
विज्ञान-तंत्र

Donald Trump Controversy : डोनाल्ड ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात! टेलर स्विफ्टचा 'तसा' फोटो शेअर केल्याने होणार कारवाई?

Donald Trump Posted AI Images of Taylor Swift Sparks Controversy : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच टेलर स्विफ्टची AIने बनवलेला एक फोटो शेअर केला आहे.

Saisimran Ghashi

Trump AI Image Share Controversy : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यांनी टेलर स्विफ्टची AIने बनवलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ट्रम्पसाठी मतदान करण्याचं आवाहन करतेय. ही फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी AIची क्षमता आणि त्याच्या जोखमींबद्दलही भाष्य केले आहे.

काय आहे प्रकरण?(Donald Trump and Taylor Swift Controversy)

ट्रम्प यांनी हा फोटो त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट केली. या फोटोत टेलर स्विफ्ट ट्रम्प यांच्या समर्थनार्थ बोलताना दाखवली आहे. हा फोटो पूर्णपणे खोटी असून AIच्या साहाय्याने तयार केली गेली आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Donald Trump and Taylor Swift AI Controversy

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ट्रम्प यांनी या फोटोबद्दल बोलत असताना AI वर असलेली त्यांची चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "माझं AI वर नियंत्रण नाही, ही प्रतिमा दुसऱ्यांनी तयार केली आहे." याचा अर्थ, ट्रम्प यांनाही ही फोटो फसवणूक असल्याचे जाणवते. पण तरीही त्यांनी ती शेअर केली, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कायदेशीर अडचणीची शक्यता

टेलर स्विफ्ट ही आपल्या प्रतिमेच्या वापराबाबत खूप संवेदनशील आहे. तिने अनेकदा अशा प्रकारच्या गैरवापराविरुद्ध कारवाई केली आहे. टेनेसी राज्याचे कायदे कलाकारांच्या प्रतिमा आणि आवाजाच्या गैरवापराविरुद्ध कठोर आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी शेअर केलेली ही AI निर्मित प्रतिमा कायदेशीर अडचणीत सापडू शकते.

ट्रम्पची विरोधाभासी भूमिका

एक तर ट्रम्प AIच्या धोक्यांबद्दल बोलतात आणि दुसरीकडे त्याच AIचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ट्रम्प यांच्या कृती आणि वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येतो. हे त्यांचे अनोखे स्वरूप आणि वादग्रस्त वर्तन पुन्हा एकदा उघड करणारे आहे.

AIचा वापर करून कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा खोटी पद्धतीने वापरली जाऊ शकते.सोशल मीडियावर पसरलेली प्रत्येक माहिती खरी असतेच असे नाही.AIच्या वाढत्या प्रभावामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

ट्रम्प यांच्या या कृतीने AIच्या वापराबाबत नवीन चर्चा सुरू केली आहे. AIच्या क्षमता आणि त्याच्या जोखमींबद्दल जागरुक राहणे आजच्या काळात खूप महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT