DRDO Missile Test eSakal
विज्ञान-तंत्र

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

Sudesh

DRDO Anti-Submarine Missile Test : संरक्षण क्षेत्रामध्ये भारत हा दिवसेंदिवस अधिक आत्मनिर्भर बनत चालला आहे. याच वाटेवर आता देशाने आणखी एक मैलाचा दगड ओलांडला आहे. देशाच्या नौदलासाठी आता DRDO ने एक खास मिसाईल तयार केली आहे. या पाणबुडी-विरोधी मिसाईलची यशस्वी चाचणी आज पार पडली.

भारतीय नौदलाने ओडिशाच्या बालासोर येथील सागरी किनाऱ्यावर या मिसाईलची चाचणी घेतली. सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो (SMART) असं या मिसाईलचं नाव आहे. DRDO ने आपल्या एक्स हँडलवरून या चाचणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

समुद्राच्या आतमध्ये होणाऱ्या युद्धासाठी ही मिसाईल अगदी फायद्याची ठरणार आहे. ही कॅनिस्टर-बेस्ड मिसाईल सिस्टीम लांब पल्ल्यांच्या टार्गेटला लक्ष्य करण्यासाठी सक्षम आहे. SMART ही मिसाईल युद्धनौकेवरून आणि किनारी भागातून देखील प्रक्षेपित केली जाऊ शकते. आपल्या उड्डाणाचा बराचसा भाग ही हवेतच पूर्ण करते. शत्रूच्या पाणबुडीच्या जवळ गेल्यानंतर यातील टॉर्पिडो रिलीज होतो आणि पाण्यातील पाणबुडीवर हल्ला करतो.

टॉर्पिडो हा सिगारच्या आकाराचं एक शस्त्र असतं. आपल्या लक्ष्याच्या संपर्कात येताच याचा मोठा विस्फोट होतो. अगदी लहान आकार असला, तरी मोठ्या पाणबुडीला निकामी करण्याची क्षमता यामध्ये असते. या मिसाईलमुळे आता भारत समुद्री सुरक्षेच्या बाबतीत अधिक सक्षम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT