during fuel price hike these are most fuel efficient and best mileage cars in every segment Google
विज्ञान-तंत्र

प्रत्येक सेगमेंटमधील कोणत्या कार देतात बेस्ट मायलेज? पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे आपल्या सगळ्यांचे बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीच्या काळात कार चालवणे खिशाला परवडणारे नाही. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सध्या बरेच ग्राहक अशी वाहने निवडत आहेत जी दमदार मायलेज देतात आणि ज्यांना चालवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला देखील एखादी बेस्ट मायलेज असलेली कार खरेदी करायची असेल तर आज आपण त्या-त्या सेगमेंटमधील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या कारबद्दल जाणून घेणार आहोत..

एंट्री लेव्हल हॅचबॅक सेगमेंट

Hyundai Grand i10 Nios - या सेगमेंटमधील कमी किमतीत चांगले मायलेज देणाऱ्या कार भारतात सर्वात प्रसिद्ध आहेत. Hyundai Grand i10 Nios चे डिझेल व्हेरियंट या सेगमेंटमध्ये बेस्ट ऑप्शन आहे. जरी या सेगमेंटमधील बहुतेक कारमध्ये फक्त पेट्रोल इंजिन देण्यात येते, परंतु ही ह्युंदाईची ही कार डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. तुम्हाला ही कार 25.49 kmpl पर्यंत मायलेज देते. दुसरीकडे, जर तुम्ही पेट्रोल कारचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी स्विफ्ट हा एक चांगला पर्याय आहे, ही कार 23.76 किमी / लीटर पर्यंत मायलेज देते.

प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट

Hyundai i20 - प्रीमियम कारमध्ये ही कार खूप प्रसिद्ध आहे, मात्र या कारचे इंजिन आणि इतर मॅकॅनिजम एंट्री लेव्हल हॅचबॅक कार सारखेच आहे. पण ही कार निश्चीतपणे आकाराने मोठी आणि अनेक अडव्हांस फीचर्ससह येते. काही रिपोर्ट्सनुसार, या कारचे डिझेल व्हेरियंट 25.2 kmpl पर्यंत मायलेज देते. दुसरीकडे, जर आपण या सेगमेंटमध्ये पेट्रोल कार पाहिल्या तर मारुती बलेनो हा एक चांगला पर्याय आहे, जो 23.87 किमी / लीटर मायलेज देतो.

मल्टी पर्पज व्हियकल (MPV) सेगमेंट

Datsun Go+ - जास्तीची आसन क्षमता आणि भरपूर स्पेस असल्याने मोठ्या एमपीव्ही कारनाही मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये मारुती अर्टिगापासून ट्रायबर आणि डॅटसन गो प्लस पर्यंत अनेक मॉडेल्सचे ऑप्शन उपलब्ध आहेत. परंतु मायलेजच्या बाबतीत डॅटसन गो+ सर्वोत्तम आहे. ही 7 सीटर कार 19 kmpl पर्यंत मायलेज देते. डॅटसन गो प्लस मध्ये कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन वापरले आहे. त्याचे मॅन्युअल व्हेरियंट 68PS ची पॉवर आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशन व्हेरियंट 77PS ची पॉवर आणि 104Nm चा टॉर्क जनरेट करते.

कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंट

Hyundai Aura - कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंट गेल्या काही वर्षांत देशात ही कार अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. जरी मारुती डिजायर या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे, परंतु मायलेजच्या बाबतीत ह्युंदाई ऑरा सर्वोत्तम आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह येते. त्याच्या डिझेल व्हेरियंटमध्ये तुम्हाला 1.2bhp/190Nm सह 1.2 लिटर डिझेल इंजिन दिले जाते. तसेच एकूण 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये येणाऱ्या ऑरा सेडानमध्ये कंपनीने 8-इंच टचस्क्रीन सिस्टामसह अनेक फीचर्स दिली आहेत. त्याचे डिझेल व्हेरियंट हे 25.4 kmpl पर्यंत मायलेज देते.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट

Kia Sonet - कमी किंमतीत स्पोर्टी फीलसह ड्रायव्हिंग परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट सध्या देशात सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. या सेगमेंटमध्ये नुकतेच लॉन्च झालेल्या टाटा पंचपासून मारुती ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू, किया सोनेटपर्यंत अनेक मॉडेल ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पण मायलेजच्या बाबतीत किआ सोनेटचे नाव सर्वात वर येते. ही छोटी SUV अडव्हांस फीचर्स आणि टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ सोनेटचे डिझेल व्हेरियंट हे 24.1 किमी / लीटर पर्यंत मायलेज देते.

मिड साईज एसयूव्ही सेगमेंट

Hyundai Creta - ममिड साईज एसयूव्ही सेगमेंट मध्ये ही कार खुप प्रसिध्द आहे. या सेगमेंटमध्ये तुम्हाला ह्युंदाई क्रेटा, टाटा हॅरियर, किया सेल्टोस आणि मारुती एस-क्रॉस सारखे ऑप्शन्स आहेत. पण मायलेजच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटा सर्वोत्तम आहे, या SUV चे डिझेल व्हेरियंट 21.4 kmpl पर्यंत मायलेज देते. कंपनीने गेल्या वर्षी मार्चमध्ये आपले दुसरे जनरेशनचे मॉडेल भारतीय बाजारात लॉंच केले आहे.

टीप: वर दिलेली मायलेज बद्दलची माहिती मीडिया रिपोर्टवर आधारित आहे. सर्वसाधारणपणे, वाहनाचे मायलेज ड्रायव्हिंग स्टाईल आणि रस्त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे वास्तविक जगात वेगळे असण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT