World Pi Day 14th March : गणितातील एक वैशिष्ट्यपूर्ण संख्या म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर दर्शविणारी संख्या - पाय. या संख्येसाठी 'पाय' या ग्रीक अक्षराचा उपयोग सर्वप्रथम विलियम जोन्स यांनी इ .स .१७०६ मध्ये केला. गणित आणि भौतिक तज्ज्ञांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज जागतिक स्तरावर विशेष म्हणजे अमेरिकेत पाय दिवस साजरा केला जातो.
'पाय डे' म्हटल्यावर तुमच्याही डोळ्यांसमोर गणिताचे आकडे आले असतील. अर्थात, हा तोच पाय आहे ज्याचा वापर केल्याशिवाय आपल्याला गणितं सोडवता येत नाहीत. पायची किंमत ही २२/७ किंवा ३.१४ अशी आहे.
आजच्याच दिवशी पाय दिवस का साजरा केला जातो असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. तर, याचंही एक विशेष कारण आहे. आज मार्च महिना म्हणजे वर्षातला तिसरा महिना आणि १४ तारीख आहे. कित्येक देशांमध्ये तारीख लिहिताना आधी महिना आणि त्यानंतर दिवस लिहितात. म्हणजेच १४ मार्च लिहिताना ३.१४ असं लिहिलं जातं. पायची किंमतही ३.१४ अशी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पाय दिवस (पाय डे) साजरा केला जातो.
भौतिक शास्त्रज्ञ असलेल्या लॅरी शॉ यांनी सर्वप्रथम १९८८ साली सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियम मध्ये पाय दिवसाचे आयोजन केले होते. त्यांना द प्रिंस आफ पाय या नावानेही ओळखले जाते. (First Pi Day)
२००९ साली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या प्रतिनिधींनी १४ मार्च हा दिवस पाय दिवस साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. त्या आधी पाय दिवस हा जुलै महिन्याच्या २२ तारखेला साजरा करण्यात येत होता. पायची दुसरी किंमत ही २२/७ अशीही आहे.
असा केला जातो ग्रीक अक्षराचा वापर
नद्यांची लांबी मोजण्यासाठी पायचा उपयोग होऊ शकतो. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी पायचा वापर करुन नद्यांची लांबी मोजण्याचा प्रयत्न केला होता. पायचा वापर करून गणिततज्ज्ञ पिरॅमिडचा आकार मोजला जातो.
अवकाशातील दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी, त्यांच्यातील अंतराचा हिशोब लावण्यासाठीही पायचा उपयोग होऊ शकतो. पायच्या किंमतीचा वापर करुन आपण आपल्या ब्रह्मांडाचा आकार अंडाकार आहे या तथ्यापर्यंत पोहोचलो आहे.
स्पेस सायन्समध्येचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी पायच्या निश्चित मूल्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, अजून कुणालाही यश आले नसल्याचे प्रा. किशोर वानखेडे यांनी सांगितले.
गणिताच्या गोडीसाठी पाय दिन आयोजित करावा
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणितात आवड निर्माण होईल असे कार्यक्रम पाय दिनानिमित्त आयोजित करून पायची किंमत अधिक अचूक सांगण्याच्या स्पर्धा व्याख्याने आयोजित करण्यात यावेत. अधिकाधिक शाळांनी पाय दिन आयोजित करुन विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.