Electric Blanket eSakal
विज्ञान-तंत्र

Electric Blanket : यंदाच्या हिवाळ्यात थंडीला करा रामराम, ही इलेक्ट्रिक रजाई देईल उबदार आराम; किंमतही अगदी कमी

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीसह आता थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Sudesh

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीसह आता थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घराघरांमध्ये कपाटात ठेवलेल्या गोधड्या आणि जाड चादरी बाहेर निघत आहेत. कित्येक लोक नवीन रुम हीटर खरेदी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला हीटरपेक्षाही एक चांगला पर्याय सुचवणार आहोत.

सध्या इलेक्ट्रिकचा जमाना आहे. त्यामुळेच साधी गोधडी वापरण्याऐवजी इलेक्ट्रिक गोधडीचा (Electric Blanket) पर्याय तुम्हाला या थंडीमध्ये फायद्याचा ठरू शकतो. अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स वेबसाईट्वर कित्येक ब्रँड्सच्या इलेक्ट्रिक ब्लँकेट उपलब्ध आहेत.

दोन ते चार हजार रुपयांपर्यंत या इलेक्ट्रिक ब्लँकेट्स उपलब्ध आहेत. यातील Expressions Polar Electric Bed Warmer या ब्लँकेटवर अमेझॉन सध्या 50 टक्के डिस्काउंट देत आहे. याची मूळ किंमत 3,599 रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर याची किंमत 1,799 रुपये झाली आहे. ही किंमत सिंगल बेड ब्लँकेटची आहे.

या ब्लँकेटमध्ये तीन हीट सेटिंग्स दिल्या आहेत. हे ब्लँकेट 12 तासांनंतर आपोआप बंद होतं. यासाठी ऑटो-शट-ऑफ फीचर देण्यात आलं आहे. यूजर्सच्या सुरक्षेसाठी हे फीचर देण्यात आलं आहे. यासोबतच सेफ्टीसाठी ओव्हरहीट प्रोटेक्शन फीचरही देण्यात आलं आहे.

मेड इन इंडिया

अमेझॉनवर (Amazon Electric Blanket) दिलेल्या माहितीनुसार, हे मेड इन इंडिया ब्लँकेट आहे. याला ISO सर्टिफिकेशन देखील मिळालं आहे. 70W एवढी उर्जा वापरणाऱ्या या ब्लँकेटवर एका वर्षांची वॉरंटी देखील देण्यात आली आहे.

या ब्लँकेटला अमेझॉन ग्राहकांनी 3.9 स्टार रेटिंग दिली आहे. गेल्या एका महिन्यात 200 हून अधिक लोकांनी याची खरेदी केल्याचं अमेझॉनने म्हटलं आहे. याच्या डबल बेड साईजच्या ब्लँकेटला अमेझॉनवर 4.1 स्टार रेटिंग आहे. याला गेल्या महिन्यात 300 हून अधिक नागरिकांनी खरेदी केलं आहे. याची किंमत 2,899 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT