विज्ञान-तंत्र

Electric Scooter Safety Features: सेन्सर असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात; अपघातापूर्वी देणार अलर्ट

Safety Features in Electric Scooter: 'एथर'ने म्हटलं की, ARAS मध्ये स्किड कंट्रोल आणि फॉल सेफ फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यातल्या स्किड कंट्रोलबद्दल सांगायचं झाल्यास, याच्यात ट्रॅक्शन कंट्रोल बसवण्यात आलेलं आहे. जो मोटरला मिळणाऱ्या टॉर्कला कंट्रोल करतो.

संतोष कानडे

Ather Rizta Electric Scooter: कोणतीही दुचाकी अथवा चार चाकी गाडी चालवताना खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. तरीही खराब रस्ते किंवा कुठल्याही कारणाने अपघात होऊ शकतो. या घटनांची संख्या कमी करण्यासाठी ऑटोमेकर्स सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. सेफ्टी फिचर्सच्या माध्यमातून वाहन चालकांना अतिरिक्त सुरक्षा मिळावी, हा त्या मागचा हेतू असतो.

एथर एनर्जी या कंपनीने आपल्या स्कूटरमध्ये एका अशा सेफ्टी फिचरचा समावेश केलाय, ज्या माध्यमातून निसरड्या रस्त्यावरुन स्कूटरला वाचवता येईल. त्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनीने वाहनामध्ये ARAS (अॅडव्हान्स राईड असिस्टेन्स सिस्टम) लागू केलं आहे. नवीन सिस्टम रायडरच्या सुरक्षेसाठी असेल.

'एथर'ने म्हटलं की, ARAS मध्ये स्किड कंट्रोल आणि फॉल सेफ फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्यातल्या स्किड कंट्रोलबद्दल सांगायचं झाल्यास, याच्यात ट्रॅक्शन कंट्रोल बसवण्यात आलेलं आहे. जो मोटरला मिळणाऱ्या टॉर्कला कंट्रोल करतो.

हे फिचर स्वतःहून ट्रॅक करुन स्कूटरची स्पीड कमी करेल. चालकाला ऑटोमॅटिक स्पीड कमी होत असल्याचा अंदाज येईल. चाकांचं रस्त्यावरील संतूलन बिघडलं की स्कूटरची स्पीड कमी होईल.

फॉल सेफ फिचर काय काम करेल?

फॉल सेफ फिचर लोकांसाठी फारच उपयोगी ठरू शकतं. या फिचरच्या माध्यमातून स्कूटरला जसं कळतं की वाहन कोसळू शकतं, अशावेळी हे फिचर अॅक्टिव्हेट होतं. या माध्यमातून गाडीला दूरपर्यंत फरफटत जाण्यासाठी वाचवलं जाऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT