Growing Fire Risk Ensuring Safety with Electric Scooters esakal
विज्ञान-तंत्र

Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर वापरताय? गमवावा लागू शकतो जीव ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Fire Risk : दिल्लीत इलेक्ट्रिक स्कूटरला आग, ३ जणांचा बळी! इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे 'हे' धोके आहेत

सकाळ डिजिटल टीम

Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. शासनाकडून देखील वारंवार इलेक्ट्रिक गाड्या स्कुटर वापरण्याचे आवाहन केले जाते. परंतु त्यांच्यासोबत आग लागण्याच्या घटनाही वाढत आहेत. अलीकडेच, दिल्लीच्या कृष्णा नगर भागात इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीत 4 मजली इमारतीला आग लागली, परिणामी 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.

नेमकं हे प्रकरण काय ?

इमारतीच्या तळघरात 11 दुचाकी उभ्या असलेल्या कृष्णा नगर परिसरात ही घटना घडली. यातील एक इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती. पहिली आग इलेक्ट्रिक मीटरपर्यंत पोहोचलेल्या स्कूटरला लागली. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या इतर दुचाकींनीही पेट घेतला. काही वेळातच आग संपूर्ण इमारतीत पसरली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी पार्क करणे,खराब चार्जर वापरणे,ओव्हरचार्जिंग,खराब किंवा जुनी बॅटरी वापरणे अशी असू शकतात.

तुम्ही तुमच्या स्कुटरला गाडीला अश्या अपघातांपासून वाचवण्यासाठी काही सुरक्षा उपाय करू शकता. ज्यामध्ये स्कूटर नेहमी खुल्या आणि हवेशीर ठिकाणी पार्क करा,योग्य चार्जर वापरा,स्कूटर जास्त चार्ज करू नका, बॅटरीची नियमितपणे तपासणी करा,नेहमी हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपकरणे वापरा.

इलेक्ट्रिक स्कूटर्स सोयीस्कर आणि पर्यावरणास अनुकूल आहेत, परंतु त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. वरील सुरक्षा उपायांचे पालन करून तुम्ही आगीचा धोका कमी करू शकता आणि स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची घेणार भेट

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT