Electric Scooter: ग्रेटा इलेक्ट्रिकने (Greta Electric) आज आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Greta Harper ZX Series-I भारतात लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 41,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ऑप्शनल बॅटरी आणि चार्जर रेंजसह ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर ग्रीन, जेट ब्लॅक, ग्लॉसी ग्रे, मॅजेस्टिक मॅजेन्टा, ट्रू ब्लू आणि कँडी व्हाईट या सहा रंगांच्या पर्यायांसह बाजारात दाखल करण्यात आली आहे.
एकदा चार्जिंग केल्यावर चालेल 100 किमी-
ही इलेक्ट्रिक स्कूटर इको, सिटी आणि टर्बो या तीन राइडिंग मोडमध्ये सादर करण्यात आली आहे. इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100किमी आहे, तथापि, सिटी आणि टर्बो मोडमध्ये त्याची रेंज 80किमी आणि 70किमी आहे.
वैशिष्ट्ये-
या स्कूटरमध्ये डीआरएल, इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, कीलेस स्टार्ट, फाइंड माय व्हेईकल अलार्म, वन यूएसबी पोर्ट (यूएसबी 2.0) सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्कूटरला ३ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.
बुकिंग-
नवीन स्कूटरची टोकन रक्कम 2000 रुपयांसह बुकिंग सुरू झाली आहे. बुकिंग क्रमांकानुसार स्कूटर 45-75 दिवसांत डिलिव्हरी केली जाईल असे कंपनीनं म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.