hero electric optima 
विज्ञान-तंत्र

Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये चालते 140 किमी, जाणून घ्या Hero Optima ची किंमत अन् फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात तुमच्यासाठी अनेक कमी बजेटमध्ये उपलब्ध पर्याय आहेत. जर तुम्हाला हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा आवडत असेल किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी त्याच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण डिटेल्स नक्की जाणून घ्या.

आज आपण Hero Electric च्या लोकप्रिय स्कूटर Hero Electric Optima बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला किंमती व्य्तिरिक्त तिची रेंज आणि कमी वजनामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमाचे व्हेरिएंट आणि किंमत

Hero Electric ने Optima दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात आणली आहे, ज्याचे पहिले व्हेरिएंट CX आहे आणि त्याची किंमत 67,190 रुपयांपासून सुरू होते.. दुसरे व्हेरिएंट म्हणजे CX ER आहे ज्यामध्ये तुम्हाला ड्युअल बॅटरी पॅक मिळतो, ज्याची किंमत 85,190 रुपये आहे. या दोन्ही किंमती दिल्लीच्या शोरूमधील आहेत.

हेही वाचा - इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स (Hero Electric Optima CX)

हिरो इलेक्ट्रिकने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 51.2V, 30Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये 550W पॉवरची BLDC मोटर जोडण्यात आली आहे. ही मोटर 1.2 kW चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 4 ते 5 तासात पूर्ण चार्ज होते.

रेंज आणि स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सिंगल बॅटरी व्हेरियंटमध्ये 82 किमी आणि डबल बॅटरी व्हेरिएंटमध्ये 140 किमीची रेंज देते. या स्कूटरची टॉप स्पीड 42 किमी प्रतितास आहे.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स चे फीचर्स

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमाच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, क्रूझ कंट्रोल, वॉक असिस्ट फंक्शन, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, रिमोट लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग यांचा समावेश आहे. पोर्ट. LED हेड लाईट सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

Hero Optima समोर टेलीस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस ड्युअल शॉक आब्झहव्हर्स सिस्टीम दिली आहे. ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे. स्कूटरला 12-इंच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर मिळतात.

इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजमध्ये Hero Electric Optima ही Bounce Infinity E1, BGauss A2 आणि Ampere Magnus शी स्पर्धा करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT