इलेक्ट्रिक बाईक्स या पर्यावरणासाठी अधिक चांगल्या समजल्या जातात. सोबतच यामुळे पेट्रोलचा खर्चही वाचतो. मात्र, या गाड्यांची रेंज कमी असल्यामुळे कित्येक लोक इच्छा असूनही याकडे पाठ फिरवतात. तुम्हीदेखील केवळ रेंजमुळे ई-बाईक घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
भारतात आता सिंगल चार्जमध्ये 150 ते 200 किलोमीटर एवढी मोठी रेंज देणाऱ्या ई-स्कूटर उपलब्ध आहेत. अशा टॉप रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाडी निवडू शकता.
Simple या कंपनीने तयार केलेली Simple One ही इलेक्ट्रिक स्कूटर सध्या देशातील सर्वाधिक रेंज देणारी ई-बाईक आहे. याची एआरएआय प्रमाणित रेंज ही तब्बल 212 किलोमीटर प्रतिचार्ज एवढी आहे. या बाईकचा टॉप स्पीड 105 किमी/तास एवढा आहे. याची एक्स-शोरुम किंमत ही 1.45 लाख रुपये आहे.
ओला कंपनीची Ola S1 Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 181 किलोमीटर धावू शकते. याचा टॉप स्पीड हा 116 किमी/तास एवढा आहे. याची एक्स-शोरुम किंमत ही 1.55 लाख रुपये एवढी आहे.
हीरो कंपनीची Vida V1 Pro ही इलेक्ट्रिक स्कूटर एका फुल चार्जमध्ये 165 किलोमीटर एवढी रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ई-बाईकचा टॉप स्पीड 80 किमी/तास एवढा आहे. हीरोच्या या गाडीची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स शोरुम) एवढी आहे.
ओकिनावा कंपनीची Okhi-90 आणि ओकाया कंपनीची Faast F4 या दोन्ही गाड्यांची रेंज ही 160 किलोमीटर आहे. ओकिनावा कंपनीच्या गाडीचा टॉप स्पीड हा 90 Kmph आहे, तर ओकाया कंपनीच्या गाडीचा टॉप स्पीड हा 70 Kmph एवढा आहे.
इलेक्ट्रिक गाडी बनवणाऱ्या प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक असणारी एथऱ या यादीमध्ये बरीच मागे आहे. Ather 450X या गाडीची रेंज ही 146 किलोमीटर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. याचा टॉप स्पीड 90 Kmph आहे. याची किंमत 1.45 लाख रुपये (एक्स शोरूम) एवढी आहे.
इलेक्ट्रिक बाईक्स घेतल्यानंतर तुम्हाला सरकारकडून काही प्रमाणात सब्सिडी देखील मिळते. त्यामुळे या गाड्या घेणं आणखी परवडतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.