Electric Shock First Aid esakal
विज्ञान-तंत्र

Electric Shock First Aid : पावसाळ्यात करंट लागल्यास ही काळजी घ्या अन् जीव वाचवा

साक्षी राऊत

Electric Shock Precautions : पावासाळ्यात पाऊस पक्षी, प्राणी, शेतकरी आणि अनेक पर्यटकांसाठी आनंद घेऊन येत असला तरी या ऋतून आपल्या बऱ्याच अडचणींत वाढ होत असते. या काळात घराच्या भिंती ओल्या झाल्या तर इलेक्ट्रिक शॉक लागण्याचा धोका वाढतो. सार्वजिक ठिकाणीसुद्धा हा धोका कायम असतो. तुमचे ओले हात चुकून एखाद्या सुरु इलेक्ट्रिक डिव्हायसेसला लागल्यास तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. पावसाळ्यात अशी स्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळायची ते जाणून घ्या.

इलेक्ट्रिक शॉक लागल्यास आवर्जून ही कामं आधी करा

करंट लागल्यास सर्वप्रथम वीजपुरवठा बंद करा.

वायरमधून थेट करंट येत असेल तर घराचा मेन स्विच बंद करणे आवश्यक आहे.

करंट लागल्यावर एखादी व्यक्ती तार किंवा विजेच्या वस्तूला अडकली असेल तर ती वेगळी करा. वेगळे करण्यासाठी नेहमी लाकडी किंवा प्लास्टिकची वस्तू वापरा. घाईत, करंट दूर करण्यासाठी तुम्ही रोलिंग पिन किंवा कंगवासारख्या वस्तू वापरू शकता.

इलेक्ट्रिक शॉक लागल्यावर थंडी जाणवू नये हे लक्षात ठेवा. मात्र, करंटमुळे जखम झाली असेल तर ती थंडीपासून वाचवण्यासाठी ब्लँकेटने झाकून ठेवू नका. त्यामुळे जखमेत जंतू चिकटण्याची भीती असते.

विजेचा झटका लागून एखादी व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तर त्याला शुद्धीवर आणा.

विजेचा झटका आल्यानंतर श्वास घेत नसल्यास ताबडतोब सीपीआर उपचार द्या. यासाठी रुग्णाला जमिनीवर सरळ झोपवा पण डोके थोडे खाली ठेवा.

सीपीआर उपचार कसे दिले जातात?

सीपीआर उपचारासाठी, बेशुद्ध व्यक्तीला जमिनीवर ठेवा.

डोके थोडे वर ठेवा.

हाताच्या मदतीने नाक दाबा.

दर एका मिनिटाला 10 श्वास घ्या, या मॉनिटर दरम्यान संबंधित व्यक्तीची छाती फुगतेय का किंवा त्यात काय हालचाली दिसून येताय यावर बारीक लक्ष ठेवा. विजेचा धक्का लागून बेशुद्ध पडल्यास सीपीआरच्या योग्य उपचाराने अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

करंट लागल्यानंतरही व्यक्ती शुद्धीत असेल तर त्याला मोकळ्या हवेत बसवा. (Lifestyle)

करंट लागलेल्या व्यक्तीने पाणी मागितल्यावर त्याला नेहमी गरम पाणी प्यायला द्यावे.

गंभीर स्थितीत, त्याला त्वरित डॉक्टरांकडे न्या.

करंट लागल्यास थोडी काळजी घेतल्यास जीव वाचू शकतो. अनेक वेळा योग्य माहिती न मिळाल्याने विजेचा धक्का लागून लोकांना आपला जीव गमवावा लागतो. (Electric Shock Incident)

ही खबरदारी आवश्यक आहे

उघड्या वायरला अनवाणी पायांनी स्पर्श करू नका.

घरातही नेहमी रबरी चप्पल घाला.

कुटुंबातील प्रत्येक सदस्याला घराच्या मेन स्विचची माहिती असायला हवी. जेणेकरून ते आपत्कालीन परिस्थितीत बंद केले जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : पत्रकार आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी होणार दोन स्वतंत्र महामंडळे! मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

Ratan Tata TCS: जागतिक संकटाचं केलं सोनं अन् रतन टाटांची लाडकी टीसीएस नंबर 1 कंपनी बनली! काय होता 'वाय-टू-के' प्रॉब्लेम?

Healthy Lunch: दुपारच्या जेवणात 'दही' खाल्यास दूर होतात पोटासंबधित 'हे' 4 आजार , जाणून घ्या फायदे

PAK vs ENG 1st Test: Harry Brook चे द्विशतक अन् Joe Root २५० पार; इंग्लंडच्या ६७६ + धावा, पाकिस्तानी रडले ना भावा

Ratan Tata Ford : तुम्हाला माहितीये काय रतन टाटा अन् फोर्डच्या अनोख्या बदल्याची कहाणी? जॅग्वार-लँड रोव्हर विकत घेत रचला होता इतिहास

SCROLL FOR NEXT