electric vehicle early-bird benefits subsidy extended till 31st march get 2 5 lack discount in Maharashtra  
विज्ञान-तंत्र

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Buying Electric Car : गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या निवडक व्हेरिएंट्सवर अर्ली-बर्ड बेनिफिट्स (early bird benefits) जाहीर केले, ज्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र आता सरकारने ही मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

जरी आता भारतात इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक टू-व्हीलर (electric vehicles in India) खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु तरीही चार्जिंग पायाभूत सुविधा आणि योग्य सबसिडी आभाव यामुळे लोक त्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत नाहीयेत. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने सादर केलेली ही अर्ली बर्ड बेनिफिट्स ऑफर (early bird benefits) बर्‍याच लोकांना इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

जुलै 2021 मध्ये, सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 2.5 लाख रुपयांची सूट (1.5 लाख रुपये सबसिडी आणि 1 लाख रुपये अर्ली बर्ड इन्सेंटिव्ह) जाहीर केला. आता ग्राहक या योजनेचा 31 मार्च 2022 पर्यंत लाभ घेऊ शकतात.

ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र सरकारची योजना सध्या फक्त दोन मॉडेल्ससाठी लागू आहे, ज्यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही Tata Nexon EV आणि टाटा टिगोर ईव्ही Tata Tigor EV इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. त्यामागील कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला बॅटरी पॅक. सरकारकडून हे अनुदान फक्त त्या मॉडेल्ससाठी दिले जाते, ज्यांची बॅटरी क्षमता 30kWh किंवा त्याहून कमी आहे. नेक्सॉन इलेक्ट्रिक कारमध्ये 30.2KWh क्षमतेचा बॅटरी पॅक आणि Tigor इलेक्ट्रिक कारमध्ये 26kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आली आहे.या अनुदानित इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना कर आणि नोंदणी शुल्कातूनही सूट मिळेल.

मात्र यामध्ये Hyundai Kona Electric आणि MG ZS EV या अर्ली बर्ड बेनिफिट्स ऑफरमधून बाहेर ठेवण्यात आल्या आहेत कारण त्या गाड्या केंद्र सरकारच्या FAME II धोरणांतर्गत येत नाहीत. या धोरणानुसार, कारची किंमत 15 लाख रुपयांपेक्षा कमी असली पाहिजे.

Tata Nexon EV

Tata Nexon EV कार XM, XZ+ आणि XZ+ लक्स व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. XM ची एक्स-शोरूम किंमत 13.99 रुपये, XZ+ ची किंमत 15.39 लाख रुपये आणि XZ+ लक्सची किंमत 16.39 लाख रुपये आहे.

Tata Tigor EV

Tata Tigor EV ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते, जी बेस XE ट्रिमची किंमत आहे. XM ट्रिमची किंमत 12.49 लाख रुपये तर XZ+ ट्रिमची किंमत 12.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. जे ग्राहक ड्युअल-टोन कलर ऑप्सन्समध्ये कार खरेदी करण्यास इच्छुक आहेत, ते XZ+ ड्युअल टोन व्हेरियंट 13.14 एक्स-शोरूम किंमतीला खरेदी करु शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT