Electric Vehicle  
विज्ञान-तंत्र

इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या इन्शुरन्सचे नियम

सकाळ डिजिटल टीम

Electric Vehicle Insurance : देशात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी वाढत असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे जनता हैराण झाली आहे त्यामुळे हळूहळू ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन कंपन्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि बाईक देखील बाजारात सादर करत आहेत. पण आज आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या विम्याबद्दल जाणून घेणार आहोत. इलेक्ट्रिक वाहनाचा विमा (Insurance) घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Electrical Vehicle विमा संरक्षण

इलेक्ट्रिक वाहने कारपेक्षा महाग असतात, डिझेल-पेट्रोल वाहनांपेक्षा त्यांच्या किंमती तुलनेने अधिक असतात त्यामुळे त्यासाठी पुरेशी कव्हरेज असलेली पॉलिसी घ्यावी (purchasing insurance policy). आपण Comprehensive coverage खरेदी केल्यास थर्ड पार्टी लायबिलिटीज आणि स्वतःचे नुकसान (Own Damage) होण्यापासून संरक्षण करते. या कव्हरेजमुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती, दंगल आणि आगीमुळे वाहनाचे नुकसान किंवा चोरी झाल्यास रिपेअरींग बिलात सवलत मिळू शकते. वैयक्तिक अपघात कवच घेतल्यास, तुम्हाला शारीरिक दुखापत, आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास सुरक्षा कवच मिळते.

Insured Declared Value काय असते?

IDV म्हणजे इंश्योर्ड डिक्लेअर्ड व्यल्यू बद्दल सोप्या भाषेत सांगायचे तर IDV ही तुमच्या कारची सध्याची किंमत आहे. IDV जितका जास्त असेल तितका प्रीमियम जास्त असेल. IDV ही विमा कंपनी तुम्हाला देणारी कमाल रक्कम असेल. तसेच कोणतेही नुकसान झाल्यास, हाय IDV तुम्हाला अधिक भरपाई देतो. इलेक्ट्रिक वाहने महाग असल्याने, जास्त IDV असलेली पॉलिसी घ्या, जेणेकरुन तुम्हाला नुकसान झाल्यास अधिक भरपुर क्लेम मिळू शकेल. विमा कंपनी IDV साठी अनेक डिटेल्स घेते, त्यात कार नोंदणी, मॉडेल माहिती इत्यादीचा समावेश असतो.

Electrical Vehicle विमा प्रीमियम

प्रीमियम ठराविक अंतराने भरावा लागत असल्याने, तो अशा प्रकारे निवडा की तो भरताना तुम्हाला कोणतीही गैरसोय होणार नाही. पण कव्हरेजमध्ये तुम्ही तडजोड करत नाही हेही बघायला हवे. परवडणाऱ्या प्रीमियमवर जास्तीत जास्त कव्हरेज देऊ शकणारी पॉलिसी निवडा.

क्लेम सेटलमेंट प्रमाण (Claim Settlement Ratio)

विमा पॉलिसी खरेदी करताना क्लेम सेटलमेंट रेशो हा महत्त्वाचा स्टँडर्ड आहे. कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो कसा आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. एखाद्याने नेहमी अशा कंपनीकडून विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे जिथे क्लेम सेटलमेंट कोणत्याही अडचणीशिवाय करता येते.

अॅड-ऑन (Add-ons)

इलेक्ट्रिक वाहनासाठी विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला झिरो डिप्रेसिव्ह अॅड-ऑन घेणे फायद्याचे ठरते. इलेक्ट्रिक वाहनासाठी विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही अॅड-ऑन बेनिफीट्स देखील जोडू शकता, मात्र यासाठी तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही Comprehensive Policy मध्ये अॅड-ऑन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT