Elon Musk Disney Lawsuit eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk : मस्कने घेतलं डिज्नीशी वैर! कंपनीवर खटला दाखल करण्याचं आवाहन; स्वतः करणार वकिलांचा खर्च.. काय आहे प्रकरण?

Gina Carano Sues Disney : हॉलिवूड अभिनेत्री जिना कॅरानोने वॉल्ट डिज्नी कंपनीवर खटला दाखल केला आहे. या खटल्यासाठी तिला इलॉन मस्क मदत करत आहे.

Sudesh

Elon Musk takes Disney Head-on : टेक जायंट इलॉन मस्कने आता थेट डिज्नी कंपनीशी वैर घेतलं आहे. हॉलिवूड अभिनेत्री जिना कॅरानोने वॉल्ट डिज्नी कंपनीवर खटला दाखल केला आहे. या खटल्यासाठी तिला इलॉन मस्क मदत करत आहे. एवढ्यावरच न थांबता, इलॉनने आपल्या एक्स हँडलवरुन इतर लोकांनाही डिज्नीविरोधात खटले दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे यासाठी सर्व प्रकारची कायदेशीर मदत आपण करु, असंही इलॉनने म्हटलं आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात.. (Musk took enmity with Disney! Call for filing a lawsuit against the company)

जिना कॅरानो

हॉलिवूड अभिनेत्री आणि माजी MMA फायटर असलेली जिना (Gina Carano) डिज्नी प्लसच्या मँडेलोरियन या शोमध्ये 'कारा ड्यून' हे पात्र साकारत होती. पहिल्या दोन्ही सीझनमध्ये हे पात्र साकारल्यानंतर, 2021 साली तिसऱ्या सीझनपूर्वी तिला शोमधून काढून टाकलं. याला कारण ठरलं तिची एक्स (ट्विटर) पोस्ट.

जिनाने एका पोस्टमध्ये नाझींनी ज्यूंची केलेली छळवणूक आणि आज रिपब्लिकन समर्थकांना सहन करावं लागणारं राजकीय वातावरण यांची तुलना केली होती. यानंतर कराराचं उल्लंघन केल्याबद्दल तिने वॉल्ट डिज्नी कंपनीला (Walt Disney Company) कोर्टात खेचलं. यामध्ये तिने नुकसान भरपाई म्हणून कंपनीकडून 75,000 डॉलर्सची मागणी केली आहे.

जिनाने म्हटलं आहे, की तिला आणि तिच्या दोन पुरूष सहकाऱ्यांना वेगवेगळी वागणूक दिली जात आहे. "इतर दोन अभिनेत्यांनी देखील अशा प्रकारच्या पोस्ट आपल्या सोशल मीडिया हँडलवर केल्या होत्या, मात्र केवळ माझ्यावर कारवाई करण्यात आली." असं तिने आपल्या लॉसूटमध्ये म्हटलं आहे. (Gina Carano Disney Lawsuit)

इलॉन मस्क

इलॉन मस्कने काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर म्हटलं होतं, की सोशल मीडिया पोस्टमुळे कुणालाही कामाच्या ठिकाणी भेदभाव सहन करावा लागणं चुकीचं आहे. तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीत कुणासोबत असा प्रकार घडत असेल, तर खुशाल आपल्या कंपनीवर खटला दाखल करा. त्यासाठी लागणारा सर्व खर्च आम्ही करू, असंही इलॉनने म्हटलं होतं. (Elon Musk against discrimination at work place)

जिनाच्या खटल्याचा संपूर्ण खर्चही इलॉन मस्कच करत आहे. एक्स कंपनीच्या एका प्रवक्त्याने म्हटलं, की आम्ही 'फ्री-स्पीच'ला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहोत. कॅरानो यांच्या खटल्यात सहभागी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. (Elon Musk Free Speech)

डिज्नीशी वैर

इलॉन मस्कने एवढ्यावरच न थांबता, एक्स हँडलवरुन डिज्नीला ट्रोल करण्यास देखील सुरुवात केली आहे. त्याने डिज्नीतील कथित इन्क्लुजन स्टँडर्ड्सची यादी शेअर केली आहे. यातूनच डिज्नीमधील वर्णभेद आणि लिंगभेद उघड होत असल्याचं मस्कने म्हटलं आहे. (Elon Musk on Disney)

"जर डिज्नी कंपनीत, किंवा त्यांच्या कोणत्याही सब्सिडरी कंपनीमध्ये (एबीसी, इएसपीएन, मार्व्हल इत्यादी.) तुमच्यासोबत भेदभाव झाला असेल; तर या पोस्टला रिप्लाय द्या. आम्ही तुम्हाला कायदेशीर मदत करू" अशा आशयाची पोस्टही इलॉनने केली आहे. (Elon Musk Disney Lawsuit)

यानंतर कित्येक नेटिझन्स इलॉन मस्कला डिज्नी कंपनी विकत घेण्याचं आवाहन करत आहेत. "प्लीज मस्क, डिज्नी विकत घ्या आणि ती कंपनी ठीक करा", "डिज्नी आता कायमची बंद होण्याची गरज आहे", "मस्क खरोखरच लोकांसाठी काहीतरी करत आहे.." अशा आशयाचे रिप्लाय इलॉनच्या या पोस्टवर पहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT