Elon Musk Big Decision eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Big Decision : 'एक्स'च्या फ्री यूजर्ससाठी आणखी एक सुविधा होणार बंद! इलॉन मस्कची मोठी घोषणा

X Feature : एक्सचे कित्येक फीचर्स केवळ ब्लू टिक असणाऱ्या यूजर्सपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत.

Sudesh

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून एक्स (ट्विटर) अ‍ॅपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. अगदी याचं नाव आणि लोगोही बदलला आहे. तसंच व्हेरिफिकेशन साठी देखील यूजर्सना पैसे द्यावे लागत आहेत. एक्सचे कित्येक फीचर्स केवळ ब्लू टिक असणाऱ्या यूजर्सपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहेत.

आता यामध्येच आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. एक्सच्या फ्री यूजर्सना आता या प्लॅटफॉर्मवरील पोल्समध्ये सहभागी होता येणार नाही. बॉट्सच्या वापराने पोल्सचे रिझल्ट बदलू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मस्कने स्पष्ट केलं आहे.

काय आहेत पोल्स?

एक्सवर एखादा प्रश्न विचारून, त्यावर होय-नाही किंवा बहुपर्याय देऊन लोकांची मतं घेतली जातात. या पोल्सचा वापर कित्येक वेळा रिसर्चसाठी देखील होतो. मात्र, कित्येक वेळा बॉट्सचा वापर करून याचे परिणाम बदलले जातात. हेच टाळण्यासाठी आता मस्कने नवीन नियम लागू केला आहे.

यानंतर आता केवळ व्हेरिफाईड यूजर्स एखाद्या पोलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. यामुळे अधिक योग्य परिणाम मिळणार आहेत. मोठे उद्योगपती ब्रायन कॅसेन्स्टीन यांनी याबाबत पोस्ट केली होती. पोलमध्ये केवळ व्हेरिफाईड यूजर्सना सहभागी होता यायला हवं, असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं. तर, इलॉन मस्कने यावर रिप्लाय देत, हा अपडेट लवकरच येणार असल्याचं म्हटलं आहे.

लवकरच मिळणार कॉलिंग फीचर

दरम्यान, एक्सवर लवकरच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर मिळणार असल्याचंही इलॉन मस्कने याआधी सांगितलं आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर न घेताही, एक्सवरुन त्या व्यक्तीला कॉल करता येणार आहे. अँड्रॉईड, अ‍ॅपल, मॅक आणि विंडोज अशा सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT