elon musk asks twitter user through poll on edit button after revealing big twitter stake  
विज्ञान-तंत्र

'तुम्हाला एडिट बटण हवंय का?'; एलन मस्कच्या पोलवर CEO अग्रवाल म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर वापरकर्त्यांना एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मस्कने ट्विटरवर युजर्सना मत देण्यास सांगितले. या पोलमध्ये मस्क यांनी युजर्सना ट्विटरवर एडिट बटणाचा पर्याय हवा आहे की नाही हे विचारले. दरम्यान नुकते ट्विटरमधील 9.2% स्टेक खरेदी केल्यानंतर मस्कने युजर्सना हा प्रश्न विचारला आहे.

मस्कच्या प्रश्नाला उत्तर देताना युजर्सने बहुतेक वापरकर्त्यांनी सांगितले की, त्यांना ट्विटरमध्ये एडिट फीचर हवे आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीही मस्कच्या या पोलवर प्रतिक्रिया दिली आहे. परागने युजर्सना सांगितले की, पोलचा निकाल नंतर खूप महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे वापरकर्त्यांने काळजीपूर्वक मतदान करा.

ट्विटर एडिट फीचर देणार

1 एप्रिल रोजी ट्विटरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून केलेल्या ट्विटमध्ये सांगितले होते की, कंपनी सध्या 'एडिट' फीचरवर काम करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काही युजर्सनी ट्विट करून विचारले की हा विनोद आहे का? उत्तरात, ट्विटरने म्हटले आहे की, "ते याची कंन्फर्म किंवा नाकारू शकत नाही, परंतु आम्ही ते एडीट करू शकतो."

ट्विटरचे शेअर्स 28% वाढले

एलन मस्क यांनी Twitter मध्ये 9.2% स्टेक घेतल्याचे 13G फाइलिंगमध्ये उघड झाल्यानंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरचे शेअर्स 28% वाढले. शुक्रवारी बाजार बंद होईपर्यंत, मस्कची ट्विटरमध्ये सुमारे $2.89 अब्ज शेअर्स होती. यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननुसार, मस्कने ट्विटरचे 73.5 दशलक्ष शेअर्स खरेदी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT