Elon Musk sakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk आणणार नवं फीचर; आता X पोस्टवर आलेल्या रिप्लायला करू शकणार डिसलाईक

सकाळ डिजिटल टीम

एलॉन मस्क आणि त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X अनेकदा चर्चेत असतात. एलॉन मस्कचे कोणतेही वादग्रस्त विधान असो किंवा X वरील फीचरची टेस्टिंग असो, लोकांना दोन्ही गोष्टींमध्ये रस असतो. आता X, Downvote नावाच्या नवीन फीचरची टेस्टिंग करत आहे.

या फीचरमध्ये, X रिप्लायला रँक करण्याच्या पद्धतींसह प्रयोग करत आहे, जे डाउनव्होट्स किंवा डिसलाईक सारखे दाखवले जातील. चला तर मग या फीचरबद्दल जाणून घेऊया.

हे नवीन फिचर कसे काम करणार

एका एक्स वापरकर्त्याने याबद्दल एक पोस्ट केली आणि या बटणाबद्दल माहिती दिली. असे सांगितले जात आहे की हे फीचर आधी iOS ॲपवर उपलब्ध असू शकते. असे सांगितले जात आहे की डाउनव्होटिंगचे हे फिचर केवळ रिप्लाय बेस्ड असेल. X च्या या फीचरबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती, त्यानंतर हे नवीन फीचर आणले जाऊ शकते.

Reddit च्या downvote पेक्षा वेगळे असेल

माहितीनुसार, हे फीचर डिसलाईक म्हणून ओळखले जाईल. आता तुम्ही विचार करत असाल की हे फीचर Reddit सारख्या प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या डाउनव्होट आयकॉनसारखे असेल, पण तसे नाही.

टेकक्रंचने अलीकडेच X च्या 'लाइक' बटणाजवळ Broken Heart आयकॉनला रिपोर्ट केले. रिपोर्टनुसार, X च्या iOS ॲपच्या बीटा व्हर्जनवर डिसलाईक बटणाचा कोड दिसला आहे. 2021 मध्ये जेव्हा एलॉन मस्क X चे मालक बनले तेव्हा या फीचरची देखील चर्चा झाली.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT