Elon Musk Launches Job Search Feature : नोकरी शोधण्यासाठी आजकाल कित्येक तरुण विविध प्रकारच्या अॅप्सचा वापर करतात. जॉब सर्चच्या बाबतीत लिंक्ड इन हे अॅप सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मात्र आता लिंक्ड इनच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण इलॉन मस्कने आता 'एक्स'वर जॉब सर्च फीचर सुरू केलं आहे.
एक्स, म्हणजेच ट्विटरला 'एव्हरिथिंग' अॅप बनवण्याचा इलॉन मस्कचा प्रयत्न आहे. यामुळेच या अॅपवर विविध प्रकारचे फीचर्स देण्यात येत आहेत. यातच आता जॉब सर्च आणि जॉब पोस्टिंग हे फीचर लाँच करण्यात आले आहे.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात एक्सने हे फीचर बीटा व्हर्जनवर लाँच केले होते. यानंतर त्याची चाचणी सुरू करण्यात आली होती. आता दोन वर्षांनंतर हे फीचर अखेर सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. सध्या हे फीचर केवळ वेब व्हर्जनवर उपलब्ध आहे. मात्र, लवकरच ते आयओएस आणि अँड्रॉईडवर उपलब्ध होईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
एक्सचं जॉब सर्च फीचर सध्या वेब व्हर्जनवर उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला जॉब टायटल आणि लोकेशन हे दोन पर्याय भरून जॉब सर्च करता येईल. तुमच्या मागणीनुसार एखादी नोकरी उपलब्ध असेल, तर त्याचे डीटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. जॉब सर्च फीचरसाठी तुमचं अकाउंट व्हेरिफाईड असण्याची गरज नाही. (Tech News)
कंपन्यांना एक्सवर जॉब पोस्टिंगचा पर्यायही मिळणार आहे. मात्र, केवळ व्हेरिफाईड अकाउंट असणाऱ्या कंपन्यांनाच हा पर्याय उपलब्ध असेल. कंपन्यांचं व्हेरिफिकेशन हे सामान्य यूजर्सपेक्षा वेगळं आहे. एखाद्या कंपनीला व्हेरिफाईड अकाउंट हवं असेल, तर त्यासाठी सुमारे 82 हजार रुपये प्रति महिना एवढी फी द्यावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.