Neuralink FDA approval Esakal
विज्ञान-तंत्र

Neuralink : इलॉन मस्क आता मानवी मेंदूमध्ये बसवणार चिप; अमेरिका सरकारने दिली परवानगी

अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना या टेक्नॉलॉजीचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जातंय.

Sudesh

इलॉन मस्कने काही वर्षांपूर्वी न्यूरालिंक हा प्रोजेक्ट लाँच केला होता. मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक मायक्रोचिप बसवून, त्यामार्फत ठराविक अपंगत्व आणि अनुवांशिक आजार बरे करण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन हा प्रोजेक्ट सुरू केला होता. आतापर्यंत केवळ प्राण्यांवर याची चाचणी घेण्यात येत होती. मात्र, आता याच्या मानवी चाचणीसाठी अमेरिकेच्या एफडीएने परवानगी दिली आहे.

दृष्टी आणि हालचालीसंबंधी अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना या टेक्नॉलॉजीचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जातंय. मेंदू आणि शरीराच्या अवयवांमधील न्यूरल लिंक्सचा वापर करून अशा व्यक्तींवर उपचार करण्याचा मानस आहे. यामुळे या प्रोजेक्टला न्यूरालिंक हे नाव देण्यात आलं आहे. २०१६ साली हा प्रोजेक्ट लाँच करण्यात आला होता.

काय आहे ही चिप

न्यूरालिंक हे इम्प्लांटेबल ब्रेन-कम्प्युटर इंटरफेस (BCI) डेव्हलप करत आहे. या मायक्रोचिप अगदी ४ ते ६ नॅनोमीटर एवढ्या आहेत. ही चिप मेंदूमध्ये बसवण्यासाठी एका रोबोटच्या मदतीने सर्जरी करण्यात येते. यानंतर ही चिप मेंदूतील सिग्नल टिपून ते कम्प्युटर आणि इतर मशीन्सना पाठवते. यासोबतच ही चिप मेंदू आणि शरीराचे इतर अवयव यांच्यामधील ताळमेळ राखेल.

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागाने (FDA) यापूर्वी न्यूरालिंकच्या मानवी चाचणीला परवानगी नाकारली होती. या चिपमध्ये असणारी लिथियम बॅटरी, आणि लहान वायर्स यामुळे मेंदूला असणारा धोका लक्षात घेता ही परवानगी नाकारण्यात आली होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत मार्चमध्ये वृत्त दिलं होतं.

एफडीएची परवानगी

आता मात्र, एफडीएने मस्कला मानवी मेंदूवर चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. न्यूरालिंकने ट्विट करत याबाबत माहिती दिली. "आम्हाला हे सांगण्यास आनंद होतोय, की प्रथमच मानवी चाचणीसाठी आम्हाला एफडीएची परवानगी मिळाली आहे. न्यूरालिंकच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामाचं हे फळ आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने कित्येक लोकांचा फायदा होईल, यादृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे." अशा आशयाचं ट्विट न्यूरालिंकने केलं आहे.

मानवी चाचणीला सुरूवात नाही

सरकारची परवानगी मिळाली असली, तरीही मानवी चाचणीला लवकर सुरूवात करण्यात येणार नसल्याचे संकेत इलॉन मस्कने दिले आहेत. "मानवी चाचणीसाठी भरती सुरू करण्यात आलेली नाही. आम्ही याबाबत लवकरच अधिक माहिती जाहीर करू." असं न्यूरालिंकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्राण्यांमध्ये उत्तम परिणाम

न्यूरालिंकने आतापर्यंत माकड आणि डुकरांवर चाचणी केली आहे. या चाचण्यांचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत. माकडावर केलेल्या एका चाचणीत तर, टेस्ट सब्जेक्ट असणाऱ्या माकडाने केवळ मनात विचार करून 'पाँग' ही गेम खेळून दाखवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT