Tesla Optimus Robot eSakal
विज्ञान-तंत्र

Tesla Optimus Robot : 'हा' रोबोट करतो मानवासारखी हालचाल, अनोख्या अंदाजात म्हणतो 'नमस्ते'! इलॉन मस्कने शेअर केला व्हिडिओ

Elon Musk Robot : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या इलॉन मस्कने ह्युमॅनॉईड रोबोट तयार केले आहेत.

Sudesh

मानवासारखे रोबोट तयार करण्याचा प्रयत्न जगभरातील कित्येक शास्त्रज्ञ करत आहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण यापूर्वी असे रोबोट पाहिले असतील. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या इलॉन मस्कने असे रोबोट खरोखरच तयार केले आहेत.

मस्कच्या टेस्ला कंपनीने हे रोबोट तयार केले आहेत. Optimus असं या रोबोटचं नाव आहे. या रोबोटचा एक व्हिडिओ आणि फोटो इलॉन मस्कने एक्स हँडलवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हा रोबोट अगदी मानवाप्रमाणे हाता-पायांची हालचाल करताना दिसत आहे. तर फोटोमध्ये हा ऑप्टिमस अनोख्या अंदाजात 'नमस्ते' करत आहे.

इलॉन मस्कने आणखी एका पोस्टमध्ये असे चार रोबोट दाखवले आहेत. ही संपूर्ण टीम असल्याचं मस्कने म्हटलं आहे. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

भारतीयांनी केलं कौतुक

नमस्ते म्हणणाऱ्या या रोबोटचं भारतीय एक्स यूजर्स मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. "ही तर भरतनाट्यम पोझ आहे", "भारताकडूनही नमस्ते", "एआय रोबोट योगा मशीन" अशा प्रकारचे रिप्लाय या फोटोला मिळत आहेत. तर "हॅलो आणि हाऊ आर यू हे आउटडेटेड झालं असून, आता नमस्तेचा ट्रेंड आला आहे" असंही एका यूजरने म्हटलं आहे.

काय करू शकतात ऑप्टिमस

ऑप्टिमस हे ह्युमॅनॉईड रोबोट कित्येक प्रकारची कामं करू शकतात. ते स्वतःच स्वतःच्या हाता-पायांची हालचाल करू शकतात. केवळ आपले व्हिजन सेन्सर वापरून ते विविध क्रिया करण्यासाठी कॅलिब्रेट केले जाऊ शकतात. या व्हिडिओमध्ये ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे ब्लॉक त्या-त्या रंगाच्या ट्रेमध्ये ठेवताना दिसत आहेत. सोबतच या व्हिडिओमध्ये हे रोबोट योगासन करतानाही दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT