Elon Musk to stop using Mobile Number : इलॉन मस्कने 'ट्विटर' अॅप विकत घेतल्यापासून त्यात मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. अॅपचं नाव, लोगो आणि कित्येक फंक्शन्सही बदलले आहेत. एक्स असं नाव केलेल्या या अॅपला 'एव्हरिथिंग अॅप' बनवण्याचा विडा मस्कने उचलला आहे. यातच पुढचा टप्पा म्हणून त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. मस्क लवकरच कॉलिंग आणि मेसेजसाठी केवळ एक्स वापरणार आहे.
"येत्या काही महिन्यांमध्ये मी माझा मोबाईल नंबर वापरणं थांबवणार आहे. मेसेज, ऑडिओ/व्हिडिओ कॉलिंगसाठी मी केवळ 'एक्स' वापरणार आहे." अशा आशयाची पोस्ट मस्क यांनी आपल्या एक्स हँडलवरून केली आहे. (Elon Musk X Post)
इलॉन मस्कने गेल्या वर्षीच हे फीचर एक्स अॅपवर लाँच केलं होतं. काही दिवसांपूर्वीच भारतासह अन्य देशांमध्ये देखील हे फीचर उपलब्ध करून देण्यात आलं. एक्सवर ऑडिओ व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुमच्याकडे प्रीमियम अकाउंट असण्याची गरज आहे. (X Audio Video Call)
व्हॉट्सअॅपवर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला व्हिडिओ/ऑडिओ कॉल करायचा असेल, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर (जो व्हॉट्सअॅपशी लिंक आहे) तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मात्र, एक्सवर तुमच्या एखाद्या फॉलोवरला कॉल करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरची आवश्यकता नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.