इलॉन मस्कच्या मालकीच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तंत्रज्ञानाची दिशा बदलणारी नवीन सुविधा आली आहे. या नवीन फीचरमुळे आता प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटों संबंधित माहिती आपोआप दिसून येणार आहे. याचा अर्थ असा, एखाद्या पोस्टमध्ये असलेला फोटो जर इतर कोणीही आधी पोस्ट केलेला असेल, तर त्याची माहिती त्या पोस्टवर दिसून येईल. यामुळे डीपफेक म्हणजे संगणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले बनावटचे फोटो, व्हिडीओ (FAKE CONTENT VIRAL) ओळखणे सोपे होणार आहे.
इलॉन मस्क यांनी स्वतः या नवीन उपक्रमाची घोषणा केली असून, "डीपफेक आणि शॅलोफेक (DEEP FAKE- SHALLOW FAKE) म्हणजे AI न वापरता केलेले फोटो एडिटिंग अशा बनावट (FAKE EDITING TWITTER) मीडियाचा प्रसार रोखण्यासाठी हा उपक्रम मोठा फरक पाडेल" असा विश्वास व्यक्त केला आहे.
ट्विटर (TWITTER ) कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे नोट फिचर अनेक पोस्ट्सवर मॅच होऊ शकतात. काही वेळा तर हजारो पोस्ट्सवर देखील मॅच होतात. आता तुम्ही थेट पोस्टच्या नोटमध्येच पाहू शकता की ही नोट किती पोस्ट्सशी मॅच होत आहे."
गेल्या काही काळात झालेले निवडणुकांचे चुकीचे वृत्तांत आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ यांच्या पार्श्वभूमीवर डीपफेकमुळे निवडणूक प्रक्रियेवर होणारा परिणाम (FAKE VIRALS IMPACT ON ELECTIONS) हा एक चिंताजनक विषय बनला आहे. याबाबत जागृती करण्यासाठी आणि डीपफेकचा धोका कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्वातंत्र्य आणि मानवाधिकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटर, भारतासह जगभरातील वापरकर्तेना आकर्षित करण्यासाठी नवीन AI-आधारीत फिचर घेऊन आले आहे. 'स्टोरीज' नावाच्या या फीचरमध्ये X वापरकर्ते Grok AI च्या मदतीने प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडिंग विषयांची थोडक्यात माहिती मिळवू शकतात. X (TWITTER) या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बातम्यांचे सारांश वाचता येणार आहे. 'स्टोरीज' नावाच्या या नवीन फीचरमध्ये X च्या ग्रोक ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. सध्या ही सुविधा फक्त प्रीमियम सदस्यांसाठीच उपलब्ध आहे.
एक्सप्लोर सेक्शनमधील 'For You' टॅबवर स्टोरीज हे फीचर पाहायला मिळेल. या ठिकाणी दाखविल्या जाणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीजंबद्दल ट्विटर वर होणाऱ्या चर्चांवर आधारित सारांश (SUMMARY) वाचता येतो. म्हणजेच, बातमीचा थेट लेख न वाचता त्या चर्चेवरून तयार झालेले सार वाचण्याची सुविधा आहे.
ट्विटर म्हणते की, ग्रोक ए.आय. (Grok AI) अजून शिकत असलेली टेक्नॉलॉजी आहे. त्यात चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, प्रत्येक स्टोरीज मध्ये "ग्रोक चुका करू शकतो. माहितीची खात्री करा" असा इशारा त्यामध्ये दिला जातो.
आधीच्या ट्विटरच्या 'मोमेंट्स' (MOMENTS) या फीचरप्रमाणे ट्रेंडिंग विषयांची माहिती देणारे हे पहिले फीचर नाही. पण, ट्विटर मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI IN TWITTER) वापर पहिल्यांदाच केला जातोय. त्यामुळे बातम्यांचे सारांश वाचण्याचा वेगळा अनुभव वापरकर्त्यांना मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.