Elon Musk Update : जागतिक स्तरावर चर्चेत असलेले टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक इलाॅन मस्क पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केल्याने ही खळबळ उडाली होती.
अश्यातच अमेरिकेतील नवकल्पनेची कंपनी न्यूरालिंकने मेंदूला लावण्याच्या चिपची दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. या चिप्समुळे दिव्यांग व्यक्ती विचार करूनच डिव्हाइसवर नियंत्रण करू शकणार आहेत. या डिव्हाइसच्या माध्यमातून मेंदूने कमकुवत असणारी व्यक्ती विचार करू शकते.
न्यूरालिंकचे मालक इलाॅन मस्क यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या चिप्सची चाचणी दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू आहे. पहिल्या रुग्णाने या चिप्सच्या मदतीने व्हिडिओ गेम खेळणे, इंटरनेट वापरणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे आणि लॅपटॉपवर कर्सर हलविणे शक्य केले आहे.
दुसऱ्या रुग्णालाही पहिल्या रुग्णासारखीच दिव्यांगता आहे. या रुग्णाला लावलेल्या चिप्समधील ४०० इलेक्ट्रोड्स चांगल्या प्रकारे काम करत आहेत. न्यूरालिंकच्या वेबसाइटनुसार, त्याच्या चिप्समध्ये १०२४ इलेक्ट्रोड्स असतात.
मस्क म्हणाले, "दुसऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे झाली आहे. यातून भरपूर सिग्नल मिळत आहेत आणि इलेक्ट्रोड्स चांगले काम करत आहेत."
मस्क यांनी दुसऱ्या रुग्णाची शस्त्रक्रिया कधी केली याबाबत माहिती दिली नाही. त्यांनी सांगितले की, यावर्षी आणखी आठ रुग्णांना या चिप्स लावण्यात येतील.
जुलैमध्ये पहिल्या रुग्णाला हे चिप्स लावण्यात आले होते. त्यावेळी त्याला काही समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, आता त्याच्या मेंदूतील सिग्नल मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोड्सची संख्या वाढली आहे.
मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती पदासाठी उभे असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यांनी सरकारची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अमेरिकेतील नियम या नवकल्पनेला अडथळा बनत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.