Nagpur : पिकांना पाणी मिळणे शेतकऱ्यांसाठी पहिली प्राथमिकता असते. बहुतांश भागात कालव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होतो. पण जेवढे पाणी शेतीसाठी वापरले तेवढेच पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात का हा प्रश्न असतो. पण आता शेतकऱ्यांनी किती पाणी वापरले आणि त्याचे शुल्क किती येणार हे ‘ॲप’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कळणार आहे.
नागपूरच्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी हे ‘ॲप’ विकसित केले आहे. विशेष म्हणजे याची चाचणी पूर्ण झाली असून हा प्रकल्प राज्य शासनाच्या मान्यतेनंतर महाराष्ट्रात राबविल्या जाऊ शकतो.
आता ॲपद्वारे कळणार कालव्यातून...
यासाठी शासनाच्या पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला आहे. सेंट विन्सेंट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला असलेले सोमेश अवचट आणि नेहाल कुबडे या दोन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी हे खास ॲप तयार केले आहे. भंडारा जिल्ह्यातील नवरगाव भागात गेली दोन वर्षे त्यांनी ॲप तयार करण्याकरिता परिश्रम घेतले.
सोमेश आणि नेहालने विविध तांत्रिक बाबी तपासल्या. शेतकऱ्यांचा पाणी वापर आणि त्यांना येणारे बिल यांचे बारकावे तपासले. बिलाचा भरणा आणि पावतीसाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. वर्षभर त्याचा अभ्यास केला. दुसऱ्या वर्षात ॲपचा वापर कसा करायचा याची चाचणी केली. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यावर त्यांनी या भागातील सर्व शेतकऱ्यांना ॲपच्या वापराचे प्रशिक्षण दिले.
या ॲपला ‘पेंच सिंचन वसुली’ असे नाव देण्यात आले आहे. पेंच पाटबंधारे विभाग आणि जयलक्ष्मी पाणी वापर संस्था यांच्या मदतीने ही चाचणी पूर्ण करण्यात आली. हा प्रयोग विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पुढे राबविल्या येऊ शकतो, अशी माहिती पेंच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शासनाच्या पेंच पाटबंधारे विभागाद्वारे शेतकऱ्यांना कालव्याच्या माध्यमातून जलसिंचनाची सोय करून देण्यात आली आहे. मात्र, पाणी वापर आणि त्याची वसुली खासगी संस्थांना देण्यात आली. बिल वसुलीत पारदर्शकतेचा अभाव आणि शेतकऱ्यांनी किती पाणी वापरले याची माहिती मिळत नव्हती. सोमेश आणि नेहालने नवरगाव भागातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी हे ॲप विकसित केले.
गेली दोन वर्षे शेतकऱ्यांच्या पाणी वापराचा आम्ही अभ्यास करून ॲप विकसित केले. त्याची चाचणी यशस्वी झाली असून पेंच पाटबंधारे विभागाने त्याची पूर्तता केली आहे.
- सोमेश अवचट व नेहाल कुबडे, ॲप तयार करणारे विद्यार्थी
सदर ॲप शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. जलसिंचनाचा वापर आणि बिल वसुली दोन्ही बाबींची माहिती शेतकऱ्यांना यातून मिळेल. हे ॲपला राज्यातील शेतकऱ्यांकरिता पुढे वापरले जाऊ शकते.
- सोनाली नाहार, उपकार्यकारी अभियंता, पेंच पाटबंधारे विभाग, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.