tecno Phone Tecno
विज्ञान-तंत्र

टेक्नो फोन्स, 20000 खालील मोबाईल फोन्स

जाहिरात

टेक्नो हा बजेट स्मार्टफोन ब्रँड असून तो अतिशय कमी किंमतीत आकर्षक वैशिष्ट्ये देत असल्याने फारच लोकप्रिय झाला आहे. आज तुम्हाला वेध घेता येतील अशा काही सर्वोत्तम टेक्नो स्मार्टफोन मॉडेल्सची आपण चर्चा करू.

टेक्नो मोबाईल (Tecno Mobile) हा भारतीय स्मार्टफोन बाजारातील नवीन हुकमी एक्का म्हणून नाव कमवायला दाखल झाला आहे. अलीकडे काही वैश्विक स्मार्टफोन ब्रँडचा बराच बोलबाला झाल्याने उद्योग क्षेत्रात मोठी चुरस निर्माण झाली. सध्या भारतात 45 हून अधिक स्मार्टफोन ब्रँड आहेत. परिणामी बाजारात नव्याने दाखल होऊ पाहणाऱ्या उत्पादनांकरिता स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते. टेक्नो फोन नव्याने आलेल्या आणि बाजारात आपले अस्तित्व निर्माण केलेल्या ब्रँडचे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

चायनीज स्मार्टफोन निर्माते कायमच उत्तम वैशिष्ट्यांसह खिशाला परवडणारे बजेट स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात अग्रेसर दिसतात. टेक्नो’ने टॉप-नोच वैशिष्ट्यांसह देशात चांगली लोकप्रियता कमावली असून 20,000 रुपयांच्या आत त्यांची मोबाईल उत्पादने उपलब्ध आहेत. ट्रान्झिशन ग्रुप ब्रँड – टेक्नो, आयटेल आणि इन्फिनिक्स’ने -- आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीदरम्यान 81% साल-दरसाल वृद्धीचा अनुभव घेतला आणि 7% बाजार हिस्सा संपादित केला. त्याशिवाय टेक्नो’च्या एकंदर स्मार्टफोन शिपमेंटचा विचार करता 2017 दरम्यान भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रवेश केल्यापासून 10 दशलक्ष युनिटचा टप्पा पार केला आहे. या लेखात, तुम्हाला मजा घेता येईल अशा Tecno phones काही आकर्षक वैशिष्ट्यांचा वेध आम्ही घेतला आहे.

टेक्नो स्पार्क 6 गो

● टेक्नो स्पार्क 6 गो हा अद्वितीय शक्तिशाली फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी रॅमसह उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे तुमची अॅप्स सुरळीत आणि वेगाने चालतील. याची प्रोसेसिंग पॉवर फोनमधील गेम खेळण्यासाठी साजेशी आहे.

● या टेक्नो फोनचा मोठा स्क्रीन 6.52 इंचांचा असून तो तुमचा फोनवर मूव्ही आणि टीव्ही सिरीयल पाहण्याचा आनंद द्विगुणीत करतो.

● हा 5000mAh बॅटरीसह येतो, सोबत स्मार्ट ऊर्जा बचत तंत्रज्ञानाची जोड आहे. त्यामुळे याची लक्षवेधी बॅटरी एक दिवसाहून अधिक काळ चालते.

● या स्मार्टफोनचे खणखणीत वैशिष्ट्य म्हणजे यातील एआय-क्षम ड्यूएल अनलॉक पद्धत. हा फोन फेशियल रेकगनायजेशनद्वारे केवळ 0.92 सेकंदांत अनलॉक करता येतो. हा बंद डोळ्यांची ओळखही नोंदवू शकतो, त्यामुळे तुम्ही झोपेत असताना फोन सुरक्षित असतो. याचे अत्याधुनिक फिंगरटीप सेन्सर फोन अनलॉक करण्यासाठी केवळ 0.2 सेकंदांचा आश्चर्यकारक वेळ घेतात. त्याशिवाय, केवळ तुमच्या बोटाच्या अग्रभागाचा वापर करून कॉलला उत्तर देणे आणि छायाचित्र घेणे यासारख्या विविध शॉर्टकटचा उपयोग करता येतो.

● या फोनचा सर्वात आश्चर्यकारक घटक म्हणजे याची किंमत असून तो अतिशय परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे अवघ्या 9,000 उपलब्ध आहे.

टेक्नो पोवा

● ‘पोवा’ म्हणजे शक्ती! या फोनच्या किंमतीत वेग आणि कामगिरी बजावणारा यासारखा दुसरा कोणताही फोन नसेल. यामधील हेलियो जी80 प्रोसेसर सोबत 128जीबी रोम आणि 6जीबी रॅम यामुळे हा फोन मल्टीटास्किंग आणि सुलभ गेमिंग अनुभव देतो. त्याचप्रमाणे यामध्ये तुमच्या फाईल सेव्ह करण्यासाठी मोठी स्टोरेज क्षमता आहे.

● हा टेक्नो फोन सर्वोत्तम हिट डिसीपेशन टेक्नोलॉजीने युक्त असून त्यामुळे बॅटरी जास्त गरम होत नाही आणि ओव्हरहीटिंगपासून बचाव होतो. हा फोन उष्णता वाहक घटकापासून बनलेला आहे. याचे 3डी मल्टी-लेयर डिझाईन चार्जिंग तापमानाला कार्यक्षम पद्धतीने नियंत्रित करतो.

● यामधील गेम असिस्टंट व्ही2.0, गेम मोड आणि गेम स्पेस यासारख्या उत्तम गेमिंग वैशिष्ट्यांमुळे हा फोन ‘स्टार’ ठरतो.

● तुमच्याकरिता बाजारात रुपये mobile phones under 20,000 (रु. 20000 च्या आतील) हा सर्वोत्तम कामगिरी बजावणारा फोन उपलब्ध आहे.

टेक्नो कॅमोन 16

● कॅमोन 16 हा एक अफलातून कॅमेरा फोन आहे. त्याने स्वत:च्या छायाचित्र क्षमतांसाठी काही आंतरराष्ट्रीय गौरव देखील प्राप्त केले आहेत. हा फोन 64 एमपी क्वाड कॅमेराने युक्त असून यातील 4 कॅमेरे भन्नाट छायाचित्र स्पष्टता देतात.

● टेक्नोकडे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ईमेज प्रोसेसिंग लॅब, TAIVOS (तैवोस) आहे, ही उत्तम एआय अल्गोरिदम अभ्यासाला समर्पित असून त्यांच्या स्मार्टफोनना अधिकाधिक फोटो आणि व्हिडीओ गुणवत्ता प्रदान करते.

● एर्गोनॉमिक डिझाईन हे या फोनचे वैशिष्ट्य आहे, हा याच्या मॅकेनिकल टेक्श्चरमुळे राजेशाही वाटतो. याची गोल्ड कटींग कलाकारी सर्वोत्तम ठरते. हे उपकरण हाताळायला अगदी सहज असून त्याची पकड चांगली आहे, त्यामुळे उपभोक्त्याला अभूतपूर्व अनुभव मिळतो.

टेक्नो स्पार्क पॉवर 2

● स्पार्क पॉवर 2 मधील 6000 mAh बॅटरी सर्वाधिक शक्तिमान असल्याने त्याला ग्राहक वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर पसंती आहे. हा फोन एकाच चार्जमध्ये 4 दिवसांचा दिमाखदार स्टँडबाय टाईम देत असल्याचा दावा करतो.

● या टेक्नो फोनची आवाजाची गुणवत्ता सुंदर आहे, ज्याचे श्रेय यामधील ड्यूएल स्टीरियो स्पीकरना जाते. हा अचूक डिजीटल साऊंड इफेक्ट निर्माण करण्यात सक्षम असून त्यातील अॅकॉस्टीक मेजरमेंट आणि करेक्शनमुळे ते शक्य होते. यामुळे आवाज चुरचुरीत, शक्तिशाली झाल्याने उपभोक्त्याला तल्लीन होण्याचा आनंद लाभतो.

● यातील मॅजिक की हे फोनचे अभिनव वैशिष्ट्य आहे, याद्वारे व्हॉल्यूम की’चा कल्पक वापर शक्य होतो. तसेच गेमिंग करताना समृद्ध गेमिंग अनुभवासाठी फायर की म्हणूनही फन अॅनिमेशन इफेक्टसह याचा वापर शक्य आहे.

● गेम मोड ऑप्टीमायजेशन हे आणखी एक उपयुक्त वैशिष्ट्य सुलभ पद्धतीने मेसेज ऑप्टीमायजेशन देऊ करते. या वैशिष्ट्यासह तुम्ही खेळ खेळत असताना तो बंद न करता पटकन संदेश पाहू शकता.

● या फोनमध्ये मजेशीर एआर इमोजी फंक्शन असल्याने त्याद्वारे तुमचे आणि तुमच्या मित्रमंडळींचे परिवर्तन इमोजीत करणे शक्य होते.

● टेक्नो स्पार्क पॉवर 2 हा रु. 20,000 च्या आत येणारा सर्वोत्तम मोबाईल फोन आहे.

टेक्नो फोन रु. 20,000 किंमतीच्या आत सर्वोत्तम वैशिष्ट्ये देणारा फोन म्हणून ओळखला जातो. बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअरवरून खरेदी केल्यास तुमच्या टेक्नो फोनवर अधिक बचतीची मजा घेता येईल. तुम्ही टेक्नो फोन किंमतीवर उत्तम ऑफर आणि डील्स मिळवू शकता. बजाज फिनसर्व ईएमआय नेटवर्क कार्डचा वापर करून नो-कोस्ट ईएमआयवर स्वत:च्या पसंतीचा फोन खरेदी करा. ईएमआय स्टोअरवर खरेदी करून टेक्नो स्मार्टफोन्सवर भन्नाट सवलती आणि ऑफर मिळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT