EU Fines Meta Esakal
विज्ञान-तंत्र

Facebook : मेटाला सर्वात मोठा दणका! तब्बल १.३ बिलियन युरोंचा दंड, युरोपियन युनियनची कारवाई

हा निर्णय दोषपूर्ण आणि अन्यायकारक असल्याचे मत मेटाकडून व्यक्त करण्यात आले.

Sudesh

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाला युरोपियन युनियनने चांगलाच दणका दिला आहे. इतर देशांमधील फेसबुक-इन्स्टाग्राम यूझर्सचा डेटा अमेरिकेत पाठवल्यामुळे मेटाला तब्बल १.३ बिलियन युरो, म्हणजेच सुमारे १० हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच डेटा ट्रान्सफर थांबवण्यासाठी मेटाला पाच महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

युरोपियन युनियनमध्ये (EU) असलेल्या देशांतील नागरिकांचा डेटा जर मेटा अमेरिकेत नेत असेल, तर तो अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या हाती देखील लागू शकतो. या भीतीमुळेच यापूर्वीही मेटाला हा डेटा अमेरिकेत न नेण्याची ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर आता करण्यात आलेल्या कारवाईमुळे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) चांगलाच अडचणीत सापडला आहे.

याआधी दिली होती वॉर्निंग

युरोपच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी २०२० साली ईयू-यूएस डेटा ट्रान्सफरला (EU-US Data Transfer) अवैध ठरवले होते. त्यानंतर गेल्या वर्षी डेटा ट्रान्सफर न करण्याची ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर युरोपात काही काळ फेसबुकची सेवा ठप्प देखील करण्यात आली होती.

याआधीही झालाय दंड

यावर्षी जानेवारीमध्ये देखील मेटावर व्हॉट्सअप या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या डेटा सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे कारवाई करण्यात आली होती. आर्यलँडच्या नियामकाने मेटावर अतिरिक्त ५.५ मिलियन युरो, म्हणजेच सुमारे ४७.८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला (EU Fines Meta) होता.

एवढंच नव्हे, तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकने नियमांचे केलेल उल्लंघन पाहता युरोपियन युनियनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेटाला ३९० मिलियन युरोंचा दंड भरण्याचे आदेश दिले होते.

पाच महिन्यांची मुदत

सोमवारी (२२ मे) युरोपियन युनियनने मेटाला १०,७६५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यासोबतच कंपनीला इतर आदेशही दिले. मेटाला अमेरिकेत होणारे डेटा ट्रान्सफर थांबवण्यासाठी पाच महिन्यांची, तर अमेरिकेत डेटा साठवून ठेवणे थांबवण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

हा निर्णय दोषपूर्ण

दरम्यान, हा निर्णय दोषपूर्ण आणि अन्यायकारक असल्याचे मत मेटाकडून व्यक्त करण्यात आले. तात्काळ बंदी घालण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी आम्ही करणार आहे. या निर्णयामुळे दररोज फेसबुक वापरणाऱ्या लाखो लोकांचे नुकसान होईल, असं मेटाचे ग्लोबल अफेअर्स अध्यक्ष निक क्लेग म्हणाले.

युरोपियन युनियनने यापूर्वी गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी अमेझॉन या कंपनीवरही कारवाई केली होती. अमेझॉनला तेव्हा ७४६ मिलियन युरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. मेटावरील आजच्या कारवाईने हा रेकॉर्ड मोडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT