Transparent Vote Counting Process Ensures Election Integrity Election Commission Officials esakal
विज्ञान-तंत्र

EVM Controversy : EVMला मोबाईल जोडता येतो का? हॅकिंगच्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

Saisimran Ghashi

Mumbai : मुंबईतील उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघातल्या निकालाचा वाद अद्याप मिटलेला नाही. या मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. दोन वेळा पुनर्मतमोजणी केल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. याबाबत त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी गैरप्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माजी अधिकाऱ्याने दिलेली विविध प्रश्‍नांची उत्तरे.

प्रश्‍न : ईव्हीएम मशिनला मोबाइल जोडता येतो का ?

उत्तर : नाही. ईव्हीएम मशिनला मोबाइल, इंटरनेट अथवा वायरलेस अशा कोणत्याही पद्धतीने जोडता येत नाही.

2.ईव्हीएम पासवर्ड अथवा ओटीपी मोबाइलवर घेता येतो का?

- नाही. ईव्हीएम मशिनला कोणत्या प्रकारे मोबाइल लिंक करता येत नाही. अथवा ईव्हीएम मशिन ओपन करण्यासाठी कोणताही पासवर्ड मोबाइलवर घेता येत नाही.

3. मतमोजणीच्या वेळेस मोबाइल केंद्रामध्ये नेता येतो का?

- नाही. कारण मतमोजणी केंद्रातून उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीकडून कोणताही चुकीचा संदेश बाहेर जाऊ नये, कोणताही वाद त्यामधून निर्माण होऊ नये हा त्यामागे हेतू आहे. मतदान केंद्रात मोबाइल सापडल्यास संबंधितांवर कारवाई होते. निवडणूक आयोगाचे तसे नियम आहेत.

4. मतमोजणी करण्याची पद्धत काय किंवा ती कशी होते ?

- मतमोजणी करण्याची पद्धत अत्यंत पारदर्शक आहे. मतमोजणीस सुरुवात करताना प्रथम टेबलवर ईव्हिएम मशिन आणि त्यासोबत सीलबंद पाकिटात असलेला ‘१७ सी’ नावाचा फॉर्म आणला जातो. त्या फॉर्मवर कोणत्या दिवशी मतदान झाले. त्यावर किती मतदान झाले यांची संपूर्ण माहिती असते. त्याची एक प्रत मतदानाच्या दिवशीच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नेमलेल्या एजंटांना देण्यात आलेली असते.

एजंट यांच्याकडील कॉपी आणि मशिनसोबत असलेल्या ‘१७ सी’ फॉर्ममधील माहिती जुळते की नाही, हे प्रथम पाहिले जाते. तसेच दोन्ही कॉपी आणि मशिनवरील माहिती यांची खात्री केली जाते. त्यानंतर ईव्हिएम मशिन आणि व्हिव्हीपॅट या दोन्हींचा नंबर मॅच करून खात्री करून घेतली जाते. ती खात्री झाल्यानंतर मशिनच्या मागील सीलची आणि त्यावरील एजंट यांच्या स्वाक्षरीची तपासणी सर्वांसमोर केली जाते.

ती खात्री झाल्यानंतर एजंट यांच्याकडून मतमोजणीसाठी परवानगी मागितली जाते. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मशिनच्या मागील सील काढून रिझल्टचे बटण दाबले जाते. ते दाबल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली आणि एकूण मतदान यांची आकडेवारी समोर येते.

ती आकडेवारी आणि ‘१७ सी’ फॉर्मवर असलेली आकडेवारी जुळते की नाही, हे पुन्हा एकदा पाहिले जाते. त्यामध्ये कोणतीही तफावत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील मशिन मोजणी करण्यासाठी घेतले जाते. अशा प्रकारे मतमोजणीची प्रक्रिया पार पडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT