Facebook Logo Change eSakal
विज्ञान-तंत्र

Facebook Logo Change : मेटाने बदलला फेसबुकचा लोगो; तुम्हाला कळाला का फरक? कशामुळे घेतला निर्णय?

सोबतच, फेसबुकचा वर्डमार्क आणि रिअ‍ॅक्शन इमोजींमध्येही थोडाफार बदल करण्यात आला आहे.

Sudesh

Facebook New Logo : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असणाऱ्या फेसबुकचा लोगो बदलण्यात आला आहे. सोबतच, फेसबुकचा वर्डमार्क आणि रिअ‍ॅक्शन इमोजींमध्येही थोडाफार बदल करण्यात आला आहे. मात्र, कित्येक जणांना अद्याप हा बदल जाणवला देखील नाहीये.

काय केला बदल?

फेसबुकच्या लोगोमध्ये निळ्या बॅकग्राऊंडवर लोअरकेस 'f' हे अक्षर आहे. जुन्या लोगोमध्ये यातील निळा रंग हा थोडा फिकट होता. नव्या लोगोमध्ये तो बदलून अगदी किंचित डार्क ब्लू करण्यात आला आहे. तर इंग्रजी 'f' अक्षरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

कंपनीच्या वेबसाईटवर असणाऱ्या वर्डमार्कमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. याचा फाँट बदलून 'फेसबुक सान्स' करण्यात आला आहे. सोबतच यामध्ये काही हलके अपग्रेड करण्यात आले आहेत.

इमोजींमध्येही बदल

फेसबुकने आपल्या अ‍ॅपमध्ये आणि वेबसाईटवर असणाऱ्या रिअ‍ॅक्शन इमोजींमध्येही बदल केला आहे. थोडा वेगळा रंग आणि वेगळ्या डिझाईनसह हे इमोजी अपग्रेड करण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये हे नवे इमोजी सर्वांना दिसू शकतील.

कशामुळे केला बदल?

लोकांना पटकन जाणवणारही नाही असा हा बदल कशामुळे केला याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. "आम्हाला फेसबुकचा लोगो अधिक बोल्ड, इलेक्ट्रिक आणि लाँग-लास्टिंग करायचा होता. यासाठी आम्ही नव्या लोगोमध्ये फेसबुकचा मूलभूत निळा रंग दिला आहे. यामुळे फेसबुकचा लोगो अधिक स्पष्टपणे दिसू शकेल. तसंच, 'f' हे अक्षर अधिक ठळकपणे उठून दिसावं यासाठी हा नवीन रंग उत्तम कॉन्ट्रास्ट देतो." असं कंपनीने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT