Facebook Down eSakal
विज्ञान-तंत्र

Facebook Down : फेसबुक-इन्स्टा अन् यूट्यूबही डाऊन, मस्कसोबत सगळ्यांनीच केलं मेटाला ट्रोल.. काल रात्री काय काय घडलं?

Meta Trolled : सुमारे दोन तासांसाठी मेटाच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. या दरम्यान एक्स या सोशल मीडिया साईटवर मेटा आणि मार्क झुकरबर्गला ट्रोल करणाऱ्या मीम्सचा सुळसुळाट पहायला मिळाला.

Sudesh

Elon Musk trolls Meta over Global Outage : मंगळवारी रात्री फेसबुक इन्स्टाग्राम अन् थ्रेड्स या मोठ्या सोशल साईट्सना ग्लोबल आउटेजचा सामना करावा लागला. भारतासह जगभरात मेटाच्या या तिन्ही वेबसाईट्स काही काळासाठी बंद झाल्या होत्या. हा आउटेज इतका गंभीर होता, की मेटाच्या अधिकाऱ्यांवर लोकांना याबाबत माहिती देण्यासाठी चक्क आपल्या प्रतिस्पर्धी 'एक्स'वर पोस्ट करावी लागली. एक्सचे मालक इलॉन मस्कने मग हीच संधी साधून मेटाला चांगलाच चिमटा काढला.

इलॉन मस्कने आपल्या एक्स हँडलवरुन मेटाला ट्रोल करणारा एक मीम शेअर केला. यामध्ये पेंग्विन्स ऑफ मादागास्कर चित्रपटातील एक फ्रेम आहे. पेंग्विन्सचा हा ग्रुप आपल्या कॅप्टनला सलाम ठोकताना यात दिसत आहे. यातील कॅप्टनला मस्कने 'एक्स' दाखवलं. तर त्याला सलाम ठोकणारे इतर म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम अन् थ्रेड्स दाखवले. एकूणच, आता सोशल मीडियाचं नेतृत्त्व आपण करणार असल्याचं मस्कने यातून म्हटलं.

यासोबतच या मीमध्ये मेटाचे अधिकारी अँडी स्टोन यांच्या एक्स पोस्टचा स्क्रीनशॉट देखील मस्कने जोडला होता. या पोस्टमध्ये अँडी म्हणतात, की "लोकांना आमच्या सेवा वापरण्यास अडचण होत आहे याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही यावर काम करत आहोत."

एक्सवर मीम्सचा पाऊस

सुमारे दोन तासांसाठी मेटाच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. या दरम्यान एक्स या सोशल मीडिया साईटवर मेटा आणि मार्क झुकरबर्गला ट्रोल करणाऱ्या मीम्सचा सुळसुळाट पहायला मिळाला. मेटाचे सीईओ मार्क सध्या भारतात आहेत. अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना ते उपस्थित आहेत. बॉस इकडे सुट्टीवर असल्यामुळेच फेसबुक-इन्स्टा बंद पडलं, असंही कित्येक यूजर्स मिश्किलपणे म्हणताना दिसले.

यूट्यूब देखील डाऊन

दरम्यान, रात्री उशीरा गुगलच्या काही सेवा बंद झाल्याचंही दिसून येत होतं. जीमेल, यूट्यूब अशा सेवा डाऊन झाल्याची तक्रार यूजर्स करत होते. मात्र काही मिनिटांमध्येच या सेवा पूर्ववत झाल्याचं गुगलने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT