Mark Zuckerberg Death eSakal
विज्ञान-तंत्र

Mark Zuckerberg Death : फेसबुक-इन्स्टाग्राम संस्थापक 'मार्क झुकरबर्ग'ला मृत्यूचा धोका.. मेटाच्या अहवालात गंभीर इशारा!

मार्क झुकरबर्गला स्वतःला बॉक्सिगं, जुजुत्सु फायटिंगची भरपूर आवड आहे. यामुळे गेल्या वर्षी त्यांच्या पायाची नस फाटली होती.

Sudesh

Meta Report Mark Zuckerberg Death : फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सची पॅरेंट कंपनी असणाऱ्या मेटाने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कंपनीचे संस्थापक-सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या जीवाला धोका असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

मार्क यांच्या मृत्यूला त्यांची जीवनशैलीच कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. मार्क आणि कंपनीतली इतर काही अधिकाऱ्यांना एडव्हेंचरस आयुष्य जगण्याची आवड आहे. यामध्ये एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स, रिक्रिएशनल एव्हिएशन, जुजुत्सु फायटिंग अशा गोष्टींचा समावेश आहे.

मार्क झुकरबर्गला स्वतःला बॉक्सिगं, जुजुत्सु फायटिंगची भरपूर आवड आहे. यामुळे गेल्या वर्षी त्यांच्या पायाची नस फाटली होती. त्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया देखील करावी लागली होती. याव्यतिरिक्त टेस्लाचे संस्थापक आणि एक्सचे मालक इलॉन मस्कसोबत बॉक्सिंग मॅचसाठी देखील मार्क जोरदार तयारी करत होते. ही मॅच पुढे होऊ शकली नाही.

मेटाचे शेअर्स तेजीत

मेटाच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय, "जर मिस्टर झुकरबर्ग काही कारणास्तव उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम पडू शकतो." अर्थात, कंपनीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर मेटाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. एकाच दिवसात कंपनीचा 200 अब्ज डॉलर्सचा नफा झाला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार कोणत्याही कंपनीने एका दिवसात मिळवलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

मृत्यूचा धोका किती?

मिक्स्ड मार्शल आर्ट्समुळे एखाद्याचा मृत्यू होणे ही अगदीच दुर्मिळ बाब आहे. आतापर्यंत या क्रीडाप्रकारामुळे केवळ 20 लोकांचा अधिकृत मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT