Facebook Post  esakal
विज्ञान-तंत्र

Facebook Post : सोशल मिडीयावर सतत होताय ट्रोल; अशा बंद करा फेसबूक कमेंट्स

फेसबूकवर काही पोस्ट केल्यावर अनेकांना वाईट कमेंटचा सामना करावा लागला असेल

सकाळ डिजिटल टीम

Facebook Post : आजकाल सोशल मिडीयावर नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. कारण स्मार्टफोन आहे त्यांचे फेसबूकवर अकाऊंट आहेच. फेसबूकवर काही पोस्ट केल्यावर अनेकांना वाईट कमेंटचा सामना करावा लागला असेल. काहींनी तर अकाऊंटच बंद केले असेल. तूम्ही कधी अशा प्रसंगात अडकलात तर घाबरून न जाता एक सोपी युक्ती करा.

जर तुम्हाला फेसबुक ग्रुपवरील पोस्टवरील कमेंट्सचा वैताग आला असेल. तर त्यासाठी फेसबुकने प्रत्येक पोस्टवर कमेंट बंद करण्याचा ऑप्शन दिला आहे. परंतु वैयक्तिक अकाऊंटवर केलेल्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट करणे थांबवण्यासाठी फेसबुकने कोणताही पर्याय दिलेला नाही. त्यामूळे एखाद्या गृपवर असलेल्या तूमच्या पोस्टवरील कमेंट बंद करता येतात.

तुम्ही त्या फेसबुक ग्रुपचे अॅडमिन असल्यास. तुम्ही त्या ग्रुपवर केलेल्या कोणत्याही पोस्टवरील कमेंट्स बंद करू शकता. तुमचे फेसबुक अकाउंट उघडा आणि तूम्हाला हवा असलेला ग्रुप ओपन करा. त्यावर असलेली तूमची पोस्ट ओपन करा. या पोस्टच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. तिथे असलेल्या ‘Turn OFF Comments’ यारव क्लिक करा.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कमेंट पूर्णपणे बंद करण्याऐवजी Slow Down Comments किंवा Limit Activity देखील निवडू शकता. तुम्ही तुम्ही ग्रुप अॅडमिनला पोस्टवरील Comments बंद करण्याची विनंती करू शकता.

पर्सनल अकाऊंटवरील कमेंट बंद कशा कराव्यात

फेसबूकच्या टाइमलाइनवरील कमेंट बंद करता येत नाहीत.पण, तूम्ही फेसबूकच्या सेटींगमध्ये काही बदल करून हे टेन्शन हलके करू शकता.यासाठी तुमच्या फेसबुक अकाऊंट उघडून सेटींगमध्ये जा

Settings & Privacy वर क्लिक करून Settings> Privacy> Public Posts वर जा. त्यानंतर "Public Post Comments" के लिए "Edit" ऑप्शन सलेक्ट करा. Who can comment on your public posts? या ऑप्शनसाठी "Friends" वर क्लिक करा. हा ऑप्शन निवडल्याने तूम्ही सार्वजनिक केलेल्या पोस्टवर केवळ तूमचे मित्र कमेंट करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT