MSP Farmer Online Registration sakal
विज्ञान-तंत्र

MSP Farmer Online Registration : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू; कोणती कागदपत्रे लागतील

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Nanded News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे देऊन संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

प्रत्यक्षात मूग, उडीद खरेदी १० ऑक्टोबर, सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. खरेदी केंद्रात मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ, लोहा तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर,

मृष्णेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. धनज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), तिरुपती शहापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर), राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रातोळी (ता.नायगाव), अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), व श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब (बु) (ता. मुखेड) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

हे कागदपत्र लागतील

  • नोंदणीसाठी आधारकार्ड

  • राष्ट्रीयीकृत बँकेचे छापील पासबुक त्यावर अकाउंट नंबर व आयएफएससी कोड स्पष्ट दिसला पाहिजे.

  • ऑनलाइन पीक पेरा असलेला सातबारा उतारा घेऊन आपल्या पिकाची नोंदणी करावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT