Features Of iphone 16 Esakal
विज्ञान-तंत्र

Features Of iPhone 16: आयफोन 16 मध्ये असणार खास फिचर्स, A18 प्रो चिप ठरणार गेमचेंजर

आशुतोष मसगौंडे

Apple या महिन्यात 9 सप्टेंबर रोजी iPhone मॉडेल 16 आणत आहे. Apple च्या मेगा इव्हेंटमध्ये फक्त iPhone 16 सीरीजच नाही तर, नवीन एअरपॉड्स आणि अपग्रेड केलेल्या फिचर्ससह नेक्स्ट-जेनचे स्मार्टवॉच देखील लाँच केले जाणार आहे.

Apple आपल्या 16 सीरीजमध्ये अनेक मोठे बदल करत आहे. त्यामुळे अनेकांना 15 सीरीजच्या तुलनेत आयफोन 16 सीरिजमध्ये कोणते मोठे बदल असतील याबाबत प्रश्न पडले आहेत.

मोठा डिस्प्ले

कंपनी 16 सीरीजमध्ये प्रो मॉडेल्समधील डिस्प्लेचा आकार वाढवणार आहे. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये अनुक्रमे 6.27-इंच आणि 6.86-इंच स्क्रीन असण्याची शक्यता आहे.

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max अनुक्रमे 6.1 इंच आणि 6.7 इंच डिस्प्लेसह येतील.

कॅप्चर बटण

iPhone 16 सीरीजमध्ये चारही मॉडेल्समध्ये कॅप्चर बटण दिले जाईल. या बटणामुळे युजर्सना फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करणे आणखी सोपे होणार आहे.

A18 प्रो चिप

iPhone 16 च्या चारही मॉडेल्समध्ये नेक्स्ट जेन A18 Pro चिप असणार आहे. नॉन-प्रो मॉडेल्समध्ये A18 चिपसेट असेल, तर iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये A18 Pro चिपसेट असल्याचे सांगितले जाते.

Apple च्या प्रगत AI फिचर्सना ऑन-डिव्हाइस प्रोसेससाठी चांगल्या चिपची आवश्यक आहे. त्यामुळे A18 प्रो चिप फोनमध्ये वापरण्यात आली आहे.

बॅटरी

आयफोन 16 सीरीजच्या प्रो मॉडेल्समध्ये बॅटरीचा आकार वाढण्याची अपेक्षा आहे. iPhone 16 मध्ये iPhone 15 पेक्षा 6% मोठी बॅटरी असण्याची शक्यता आहे, तर iPhone 16 Pro Max मध्ये 5% मोठी बॅटरी असेल अशी चर्चा आहे. तर iPhone 16 Pro मध्ये 9% मोठी बॅटरी आहे असे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi language: मराठी भाषा ही भारताचा अभिमान! अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर मोदींकडून गौरवोद्गार, वाचा नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात! वचनपूर्ती सोहळ्यासाठी ४० हजार महिला लाभार्थी आणण्याचे अधिकाऱ्यांना टार्गेट; तलाठ्यांकडे ‘ही’ जबाबदारी

Marathi Classical Language: एका लढ्याला यश...! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Marathi Classical Language: मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ; Babar Azam चा काल राजीनामा अन् आज खेळाडूची निवृत्ती

SCROLL FOR NEXT