Maharashtra Nari Shakti Doot App esakal
विज्ञान-तंत्र

'नारीशक्ती दूत' ॲपवरुन लाखो लाडक्या बहिणी घरी बसूनच भरताहेत अर्ज; नेमका कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर..

योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.

तात्या लांडगे

सध्या अर्ज केवळ अंगणवाड्यांमध्येच स्वीकारले जात आहेत. बहुतेक महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे ॲन्ड्राईड मोबाईल (Android Mobile) नाहीत.

सोलापूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Majhi ladki Bahin Yojana) पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करून लाभार्थी महिलांना दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नयेत, म्हणून रहिवासी व उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून त्याला पर्याय देण्यात आला. पण, अनेकजण ‘नारीशक्ती दूत’ ॲपऐवजी (Maharashtra Nari Shakti Doot App) ऑफलाइनच अर्ज करीत आहेत. त्या लाभार्थी महिलांना त्यांचा अर्ज ऑनलाइन अपलोड करताना पुन्हा हेलपाटा मारावा लागणार आहे.

योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. पण, सध्या अर्ज केवळ अंगणवाड्यांमध्येच स्वीकारले जात आहेत. बहुतेक महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे ॲन्ड्राईड मोबाईल (Android Mobile) नाहीत. त्यामुळे त्या महिला ऑफलाइन अर्ज भरून अंगणवाड्यांमध्ये देत आहेत. गुरुवारपर्यंत जवळपास आठ हजार प्राप्त झाले होते. आता दिवसेंदिवस अर्जांची संख्या वाढणार आहे.

ऑफलाइन अर्ज अंगणवाडी (Anganwadi) सेविकांना पुन्हा ऑनलाइन अपलोड करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र अर्जांच्या प्रमाणात प्रतिलाभार्थी ५० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, ऑनलाइन अर्ज करावा तर त्याठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचा पर्याय दिसतोय, त्यामुळे अनेकजण १५ वर्षांपूर्वीचे जुने रेशनकार्ड, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागद जोडून ऑफलाइन अर्ज जमा करीत आहेत. पण, या लाभार्थींना पुन्हा त्यांचा अर्ज अपलोड करताना फोटो काढण्यासाठी तेथे जावेच लागणार आहे.

अर्ज भरताना ‘हे’ लक्षात ठेवा

  • - सुरवातीला प्ले स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करा

  • - ॲप उघडल्यावर मोबाईल क्रमांक, ई-मेल टाकून त्याखाली आपण कोणत्या गटात मोडतो (सामान्य महिला, गृहिणी असे) ते टाका

  • - ते सबमिट केल्यावर ओटीपी येईल, तो त्याठिकाणी टाका म्हणजे तुमचे प्रोफाइल तयार होईल

  • - प्रोफाइल तयार झाल्यावर खालील बाजूला नारीशक्ती दूत, योजना, यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाइल असे पर्याय आहेत, त्यापैकी ‘नारीशक्ती दूत’वर क्लिक करा

  • - त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय दिसेल आणि तो उघडून त्यावरील माहिती भरा

  • - अर्जातील संपूर्ण वैयक्तिक माहिती भरल्यावर आधारकार्ड, रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड अपलोड करावे लागेल. शेवटी अर्जदाराचे हमीपत्र देखील अपलोड करावे लागणार असून त्यासाठी हमीपत्र डाऊनलोड करून ते भरून ठेवा म्हणजे त्याचा फोटो अपलोड करता येईल.

  • - सर्वात शेवटी फोटोचा पर्याय असून आपला स्वत:चा (लाभार्थी महिला) फोटो काढून त्यावर अपलोड करून अर्ज सबमिट करा आणि त्याचा स्क्रिन शॉट काढून ठेवा

समित्या नेमल्यावरच अर्जांची पडताळणी

योजनेच्या शासन निर्णयातील बदलानुसार तालुका स्तरावरही समित्या नेमल्या जाणार आहेत. त्या समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य अशासकीय असणार आहेत. त्यांची नावे कोणाकडून घ्यायची हे अनिश्चित असून तहसीलदारही संभ्रमात आहेत. दरम्यान, प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन झाल्याशिवाय अर्जांची पडताळणी अशक्यच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT