Fire-Boltt Infinity Sakal
विज्ञान-तंत्र

Smartwatch: आता घड्याळावरूनच करा थेट कॉल, कमी बजेटमध्ये Fire-Boltt ची शानदार स्मार्टवॉच लाँच

Fire-Boltt Infinity स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच झाली आहे. या वॉचची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fire-Boltt Infinity Watch Features: फायर-बोल्टने भारतात आपल्या नवीन स्मार्टवॉचला लाँच केले आहे. कंपनीने Fire-Boltt Infinity ला ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले असून, यामध्ये ४ जीबी इन-बिल्ट स्टोरेज, वॉइस असिस्टेंट सपोर्ट, 300+ स्पोर्ट्स मोड, मेटल बॉडी डिझाइन आणि स्मार्ट नॉटिफिकेशन सारखे फीचर्स मिळतील. या वॉचच्या किंमत, फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Fire-Boltt Infinity ची किंमत

Fire-Boltt Infinity ची किंमत ४,९९९ रुपये आहे. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून ९ जानेवारीपासून वॉचची विक्री सुरू होईल. वॉच ब्लॅक, गोल्ड आणि व्हाइट रंगात येते.

Fire-Boltt Infinity चे फीचर्स

Fire-Boltt Infinity मध्ये १.६ इंच स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन ४००x४०० पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज, स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ९० टक्के आणि पीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. यात ब्लूटूथ कॉलिंगचा देखील सपोर्ट मिळतो.

हेही वाचा: Smart TV Offer: मस्तच! अवघ्या ८ हजारात खरेदी करा ५० इंच स्मार्ट टीव्ही, बंपर ऑफरचा मिळेल फायदा

वॉचला TWS शी देखील कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला सहज गाणी ऐकण्याचा आनंद घेता येईल. वॉचमध्ये ४ जीबी इन-बिल्ट स्टोरेज मिळते. तुम्ही सहज ३०० पेक्षा अधिक गाणी स्टोर करू शकता.

Fire-Boltt Infinity मध्ये ३०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले असून, याद्वारे डेली अ‍ॅक्टिव्हिटी आणि वर्कआउट ट्रॅक करण्यास मदत मिळेल. याशिवाय वॉचमध्ये वॉइस असिस्टेंट, गुगल असिस्टेंट आणि सिरीचा सपोर्ट मिळेल. वॉचमध्ये HR सेंसर, एक SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, फीमेल हेल्थ ट्रॅकर, 110 पेक्षा अधिक वॉच फेसेज, ब्लूटूथ 4.0, क्रेक रेसिस्टेंस, IP67 डस्ट अँड वॉटर रेसिस्टेंस आणि सोशल मीडिया नॉटिफिकेशन सारखे फीचर्स मिळतील.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT