AI Pin : एआय पिन बनवणारी कंपनी ह्यूमनने आपल्या ग्राहकांना धक्कादायक बातमी दिली आहे. कंपनीने ग्राहकांना तात्काळ चार्जिंग केस वापरणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारण, या चार्जिंग केसमध्ये वापरलेल्या बॅटरीमुळे आग लागण्याचा संभाव्य धोका आहे.
वृत्तानुसार, ह्यूमनने एआय पिन वापरणाऱ्यांना ईमेल पाठवून कळवले आहे की, चार्जिंग केसमध्ये वापरलेल्या बॅटरीमुळे सुरक्षा धोका असू शकतो. या बॅटरी पुरवठादार करणाऱ्या कंपनीशी ह्यूमनने संबंध तोडले आहेत.
कंपनीने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, ही समस्या फक्त चार्जिंग केसपुरतीच असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एआय पिन, मॅग्नेटिक बॅटरी बूस्टर आणि चार्जिंग पॅड यावर कोणताही परिणाम होणार नाही कारण त्यामध्ये या बॅटरीचा वापर केलेला नाही.
ह्यूमनने तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्रुटीपूर्ण चार्जिंग केस वापरणाऱ्यांना मोफत बदल मिळणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या समस्येची भरपाई म्हणून कंपनी सर्व वापणार्यांना दोन महिन्यांची मोफत सदस्यता देणार आहे. या सदस्यतेची किंमत सुमारे 2000 रुपये आहे. ही सदस्यता एआय पिनच्या अनेक वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी आवश्यक आहे.
ह्यूमनने या वर्षाच्या एप्रिलमध्ये एआय पिन लाँच केले होते. मात्र, अनेक प्रसिद्ध यूट्यूबर्स आणि वृत्तपत्रांनी या उपकरणाबाबत तक्रार केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे उपकरण खूप हळू आणि कधी कधी तर हवामान अहवाल मिळवण्यासाठी देखील 10 सेकंदांपर्यंत वेळ लागतो.
एका खास वैशिष्ट्याद्वारे वापरकर्त्याच्या हाताची स्क्रीन बनवून मेन्यू आणि माहिती दाखवण्याची सोय आहे. मात्र, या वैशिष्ट्याचा वापर करणे कठीण असल्याचे आणि दिवसाच्या वेळी स्क्रीनवर काय आहे ते पाहणे कठीण असल्याचे समीक्षकांनी सांगितले.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात ह्यूमन कंपनी विकण्याचा विचार करत होती. कंपनी 750 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलर दरम्यान विकण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.