Zombie Drugs Death Esakal
विज्ञान-तंत्र

Zombie Drugs Death : अमेरिकेतील 'झॉम्बी ड्रग' पोहोचलं युरोपात; ब्रिटनमधील ४३ वर्षांच्या व्यक्तीचा बळी!

या ड्रगचा वापर खरंतर पिसाळलेले घोडे किंवा गाईंना शांत करण्यासाठी केला जातो.

Sudesh

अमेरिकेत सध्या झॉम्बी ड्रगने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच फिलाडेल्फिया शहरातील काही भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता युरोपातही हे ड्रग पोहोचल्याचं दिसून येत आहे. यूकेमधील एका ४३ वर्षीय व्यक्तीचा या ड्रगमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Xylazine असं या ड्रगचं नाव आहे. याला ट्रान्क (tranq drug) नावानेही ओळखलं जातं. याचा वापर खरंतर पिसाळलेले घोडे किंवा गाईंना शांत करण्यासाठी केला जातो. मात्र, ब्लॅक मार्केटमधून याची विक्री अमली पदार्थाच्या रुपात केली जाते. हेरॉईन किंवा फेंटानील (fentanyl) अशा अमली पदार्थांमध्ये मिक्स करून हे विकलं जातं.

माणसं होतात झॉम्बी

हे ड्रग घेतल्यानंतर लोकांमध्ये झॉम्बीप्रमाणे लक्षणं दिसून येतात. गेल्या वर्षी अमेरिकेतील काही लोकांचे विचित्र वागतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या लोकांची त्वचा निघत होती, तसंच त्यांना चालतानाही अडचण येत होती. एखाद्या हॉलिवूडपटातील झॉम्बी ज्याप्रमाणे असतात, अगदी तसेच हे लोक दिसत असल्यामुळे या ड्रगला झॉम्बी ड्रग (Zombie drug kills man in UK) असं नाव पडलं.

हे ड्रग घोड्यांना शांत करण्यासाठी वापरण्यात येत असल्यामुळे, माणसांवर याचा आणखी गंभीर परिणाम दिसून येतो. कित्येक व्यक्ती तासंतास बेशुद्ध पडून राहतात, तर कित्येकांना श्वसनास अडचण येते. अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरातील या ड्रग्सचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

युरोपात तस्करी सुरू

ब्रिटनमध्ये या ड्रगचा बळी आढळून आल्यामुळे आता अमेरिकेतील या ड्रग्सची तस्करी युरोपातही होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत उल्लेख केलेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारचे ड्रग्स आढळून आले. त्याच्या रक्तामध्ये आठ प्रकारचे ड्रग्स होते, तर लघवीमध्ये आणखी तीन प्रकारचे ड्रग्स आढळून आले. सायन्स अलर्टने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

या व्यक्तीचा मृत्यू २०२२ मध्ये झाला होता. मात्र त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. त्याच्या शरीरात मिळालेल्या अनेक प्रकारच्या ड्रग्समुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होत नव्हतं. मात्र, आता हा झॉम्बी ड्रग्सचा बळी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीने कदाचित हेरॉईन हे ड्रग खरेदी केलेले असावे. यामध्ये झायलाझीन आणि फेंटालीन देखील मिसळले असल्याची त्याला माहिती नसावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT