Tata Tiago CNG google
विज्ञान-तंत्र

देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार; देतात 31KM पर्यंत मायलेज

सकाळ डिजिटल टीम

cheapest cng car in india : वाढत्या इंधनांच्या किंमतीमुळे सीएनजी (CNG Car) वाहनांची बाजारपेठेत मागणी झपाट्याने वाढत आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाईनंतर आता टाटा मोटर्सनेही या सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. अलीकडेच मारुती सुझुकीने एक तर टाटाने दोन नवीन सीएनजी वाहने लाँच केली आहेत. आज आपण देशातील सर्वात स्वस्त 5 सीएनजी वाहनांबद्दल माहिती देणार आहोत. ज्यांची किंमत 4.89 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Alto 800 CNG

ही देशातील सर्वात स्वस्त CNG कार आहे. त्याच्या LXI मॉडेलची किंमत 4.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कारमध्ये 0.8-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे जे सीएनजी वापरुन 41PS पावर आणि 60Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे ही कार CNG मध्ये 31.59 किमी/किलो मायलेज देते.

Maruti S-Presso CNG

मारुती एस-प्रेसो या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या LXI मॉडेलची किंमत 5.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कारला 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे CNG सह 59PS पावर आणि 78Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ही कार CNG मध्ये 31.2 किमी/किलो पर्यंत मायलेज देते.

Maruti Eeco CNG

यादीतील तिसरी कार देखील मारुतीची आहे. ही 7 सीटर कार असून Maruti Eeco च्या CNG व्हेरियंटची किंमत 5.88 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. मारुती Eeco CNG 1.2L पेट्रोल इंजिनसह येते जे 6000rpm वर 62bhp आणि 3000rpm वर 85Nm पीक टॉर्क जनरेट करते. मारुती Eeco CNG ची ARAI सर्टिफाईड फ्यूल इकॉनमी 20.88 km/kg आहे.

Tata Tiago CNG

टाटा टियागो सीएनजी नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. त्याची किंमत 6.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. Tata Tiago CNG 1.2-लीटर रेवोट्रॉन इंजिनसह येते. इंजिन 73 PS चा पॉवर आउटपुट देते. या कारला 165 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. मात्र कंपनीने अद्याप त्याच्या मायलेजची माहिती दिलेली नाही.

Hyundai Santro CNG

ही CNG कार यादीतील पाचवी कार आहे. तिची किंमत देखील Tiago प्रमाणे 6.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कारमध्ये 1.1-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे CNG सह 59PS आणि 85Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार CNG मध्ये 30.48 km/kg पर्यंत मायलेज देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT