five tips while buying new laptop nagpur news 
विज्ञान-तंत्र

नवीन लॅपटॉप खरेदी करताय? मग 'या' पाच गोष्टी वाचा अन् घ्या फायदा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ऑफिसचे काम असेल किंवा मुलांचा अभ्यास सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहोत. त्यासाठी लॅपटॉपची गरज असतेच. त्यासाठी तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर काही बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला ऑनलाइन साईटवर  चांगले ऑफर्स दिसतील. त्यावरून तुम्ही परवडणाऱ्या दरात लॅपटॉप खरेदी करू शकता. मात्र, लॅपटॉप खरेदी करताना काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. मग चला तर जाणून घेऊयात या टिप्स 

लॅपटॉपची गरज? -
तुम्हाला ऑफिसचे काम, ऑनलाइन क्लास यासाठी लॅपटॉप घ्यायचा असेल तर २५ ते ३० हजारांपर्यंत चांगले लॅपटॉप मिळतात. मात्र, खरेदी करताना काही चांगल्या स्पेसिफिकेशनचे लॅपटॉप डिस्टाउंटमध्ये मिळत असतील २ ते ४ हजार रुपये जास्त खर्च करून चांगला लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता. लॅपटॉप सारख्या वस्तू आपण वारंवार विकत घेत नसतो. त्यामुळे चांगली टेक्नॉलॉजी असणारे लॅपटॉप खरेदी करणे गरजेचे आहे.

लॅपटॉपचा उपयोग -
सर्वात आधीच लॅपटॉपचा उपयोग काय आहे हे ओळखा. ऑफिस आणि मुलांच्या अभ्यासासाठी लॅपटॉप घेत असाल तर खूप जास्त महाग लॅपटॉप खरेदी करण्याची गरज नाही. कमी क्षमता असलेल्या ड्राइव्हमध्ये पण तुमचे काम होईल. मात्र, गेमिंग किंवा प्रॉफेशन यूजसाठी घेत असाल महाग लॅपटॉप खरेदी करणे सोयीस्कर ठरेल.

लॅपटॉपची डिझाइन -
आजकाल स्लीक लॅपटॉपचे मार्केट आहे. त्याचा आकार १४ इंच असतो. कमी आकार असलेले लॅपटॉप थोडे महाग येतात, तर १५.६ इंच असणारे स्वस्त मिळतात. मात्र, आपल्याला कुठेही घेऊन जायचे असेल तर लहान लॅपटॉप कामात येता.. लॅपटॉप खरेदी करताना त्याच्या वजनाचा देखील विचार  करणे गरजेचे आहे. लेटेस्ट लॅपटॉप हलके असतात, जुने लॅपटॉप वजनाला जास्त असतात.

प्रोसेसर, रॅम आणि मेमोरी -
नवीन लॅपटॉप खरेदी करताना इंटेल I3 चे 10 जेनरेशन प्रोसेसर किंवा त्यापेक्षा लेटेस्ट प्रोसेसर असणे गरजेचे आहे. तसेच रॅम जर पाहिजे असेल तर ४ जीबी रॅम गरजेची आहे. तसेच लॅपटॉपमध्ये २५० पेक्षा जास्त मेमोरी असेल तर चांगले आहे. लॅपटॉप चांगल्या स्पेसिफिकेशनचा असेल तर तुमचे काम तितकेच चांगले होईल.

डिस्प्ले आणि कनेक्टिव्हीटी पोर्ट -
नेहमी नॉन रिफ्ल्टेक्टीव्ह स्क्रीनवाले लॅपटॉप खरेदी करा. किंवा कमीत कमी ७२० पिक्सल रिझोल्यूशन असणारे लॅपटॉप घ्या. तसेच लॅपटॉपमध्ये किती कनेक्टींग पोर्ट आहेत याचाही विचार करा. लॅपटॉप खरेदी करताना एक टाइप ए यूएसबी पोर्ट, एक टाइप -सी पोर्ट, हेडफोन जैक, एन लैन पोर्ट माइक्रो एसडी कार्ड रीडर और एक एचडीएमआई पोर्ट असणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT