flipkart amazon republic day sales starts from january 17 
विज्ञान-तंत्र

फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर 17 जानेवारीपासून रिपब्लिक डे सेल! मिळेल बंपर सूट

सकाळ डिजिटल टीम

Flipkart-Amazon Republic Day Sales : ई-कॉमर्स वेबसाइट्स ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट(Flipkart) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या सेल इव्हेंट्सची घोषणा केली आहे. 17 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल होणार आहे, तर Flipkart चा बिग सेव्हिंग डे सेल 17 ते 22 जानेवारी दरम्यान सुरु राहाणार आहे. नेहमीप्रमाणेच, ॲमेझॉन प्राइम मेंबर्स आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना सामान्य ग्राहकांच्या 24 तास आधी या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्स पाहाता येणार आहेत.

ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2022 (Amazon Great Republic Day Sale )

हा सेल येत्या 17 जानेवारीला सुरू होईल आणि 20 जानेवारी पर्यंत चालणार आहे. याचा अर्थ Amazon प्राइम मेंबर्स 16 जानेवारीला डील आणि ऑफर पाहू शकणार आहेत.

तुम्हाला या सेलमध्ये SBI क्रेडिट कार्ड्सवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट देण्यात येईल. तसेच लोक वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देखील मिळवू शकतात. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर 70 टक्के आणि ऑटोमोटिव्ह वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

तसेच वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार Boat Watch Matrix, Samsung Galaxy Tab A8, and Boat Airdopes 181 earbuds हे या सेलमध्ये लॉन्च केले जातील.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल 2022 (Flipkart Big Saving Days sale)

फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग डेज सेल 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 22 जानेवारीपर्यंत चालेल आणि फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स 16 जानेवारी 2022 रोजी सेल मध्ये देण्यात येणाऱ्या ऑफर्स पाहू शकणार आहेत.

सेल दरम्यान, खरेदीदारांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के इस्टंट डिस्काउंट मिळेल. वेबसाइटने अद्याप स्मार्टफोन्सवर खास डिल्स जाहीर केल्या नसल्या तरी, Poco, Apple, Realme आणि Samsung सारख्या स्मार्टफोन ब्रँड्स त्यांच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट देतील अशी अपेक्षा आहे. स्मार्टवॉच, इअरबड्स, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट या सेलमध्ये मिळणार आहे.

तुम्ही कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल इव्हेंट तुमच्यासाठी आहे. तुम्ही अनेक बंपर ऑफर्सवर या सेलमध्ये हात साफ करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT